बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या तिच्या ‘ताली’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. ‘ताली’मधील सुष्मिताच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अभिनयाबरोबरच सुष्मिता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. गेल्यावर्षी आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी सोशल मीडियावर सुष्मिता सेनसह काही फोटो शेअर केल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते. याबद्दल सुष्मिताने नुकत्याच ‘झूम’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे.

हेही वाचा : “हिंदू आहेस मंदिरात जा”, ‘तारक मेहता’ फेम मुनमुन दत्ता मशिदीत गेल्यामुळे ट्रोल; नेटकरी म्हणाले, “तुला अनफॉलो…”

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
Ajit Pawar on Walmik Karad
Ajit Pawar on Walmik Karad: वाल्मिक कराडवर मकोका दाखल होताच अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “दोषींना…”
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”

ललित मोदींबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर मौन सोडत सुष्मिता सेन म्हणाली, “माझ्या फोटोंवर करण्यात आलेल्या सगळ्या कमेंट्स मी वाचत होते. अनेकांनी मला कमेंट्समध्ये ‘गोल्ड डिगर’ म्हटले होते. प्रत्येकासाठी अपमान हा अपमान असतो. माझाही अपमान करण्यात येत होता. खरंतर माझ्या वैयक्तिक जीवनाशी कोणाचा काहीच संबंध नाही. मला ट्रोल करणाऱ्या सगळ्या लोकांना मी पुन्हा एकदा सांगेन ‘नन ऑफ युअर बिझनेस’ तुम्हाला माझ्या व्यक्तिगत जीवनात काय चालले आहे हे जाणून घेण्याचा अधिकार नाही. मी सध्या एकटी (सिंगल) आहे आणि मला याबाबत कोणाला स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही.”

हेही वाचा : “हसली, रडली अन् शेवटच्या रांगेत बसून…”, रणवीर सिंहने सांगितला बायको दीपिकासह ‘रॉकी और रानी’ पाहतानाचा किस्सा

“गोल्ड डिगर संदर्भात मी गेल्यावर्षी एक पोस्ट शेअर करत सर्वांना उत्तर दिले होते. यानंतर अनेकांनी मला सांगितले की, तुम्हाला तुमची बाजू स्पष्ट करण्याची किंवा कोणालाही उत्तर देण्याची गरज नाहीये. पण, माझ्याबद्दल लोक काहीपण बोलू लागले तर, मी नक्कीच उत्तर देईन.” असे सांगत सुष्मिताने पुन्हा एकदा ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

हेही वाचा : “माझी बायको, माझं वेड!”, जिनिलीयाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखने शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, “तू माझी…”

गेल्यावर्षी ललित मोदींनी सुष्मितासह अनेक फोटो शेअर करत रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केले होते. मात्र, सुष्मिताने यावर कायम मौन बाळगले होते. तिने फक्त ‘गोल्ड डिगर’ म्हणून ट्रोल करणाऱ्यांसाठी पोस्ट शेअर केली होती. आता अभिनेत्रीने ती एकट्याने (सिंगल) आयुष्य जगत असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, लवकरच सुष्मिता ‘ताली’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. ‘ताली’ हा चित्रपट १६ ऑगस्टला जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय अभिनेत्री ‘आर्या’ वेबसीरिजच्या तिसऱ्या पर्वाचा देखील एक भाग आहे.

Story img Loader