सुष्मिता सेन (Sushmita Sen) उत्तम अभिनेत्री व सौंदर्यवती असण्याबरोबरच स्पष्टवक्तीही आहे. १८ व्या वर्षी मिस युनिव्हर्स जिंकणारी पहिली भारतीय ठरलेल्या सुश्मिताने अनेक तरुणींना स्वप्न पाहण्यासाठी प्रेरणा दिली. सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर सिनेसृष्टीत आलेल्या सुश्मिताने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. अगदी कमी वयात रेनी आणि अलिसा या दोन मुलींना दत्तक घेऊन तिने सामाजिक नियमांना आव्हान दिलं. त्या काळात तिने अनेक धाडसी पावलं उचलली आणि ती आजही तिच्या ठाम मतांमुळे व स्पष्ट वक्तव्यांमुळे चर्चेत असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सुश्मिता सेनने नुकतीच अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुलाखत दिली. या मुलाखतीत सुश्मिताने तिची ओळख आणि स्वातंत्र्य जपण्यात आलेल्या अडचणी सांगितल्या. ९० च्या दशकात ज्या विषयांवर फार बोललं जात नव्हतं, त्या विषयांवर उघडपणे बोलल्याने तिच्याबद्दल मतं बनवली गेली, असा अनुभव सुश्मिताने सांगितलं. ती फक्त १८ वर्षांची असताना एका मुलाखतीत तिने ‘सेक्स’ शब्द उच्चारला होता, ज्यानंतर खूप बोभाटा झाला होता. लहान मुलांच्या मनावर परिणाम होईल असं बोललं गेलं आणि मग तिच्या पालकांनी तिला जपून बोलण्याचा सल्ला दिला होता, तेही तिने सांगितलं.
“तेव्हा समाज आजच्यासारखा मोकळ्या विचारांचा नव्हता. लोक वेगळ्या पद्धतीने व्यक्त व्हायचे, त्यामुळे एक वेळ अशी आली की माझ्या आई- बाबांनी मला बसवलं आणि सांगितलं की ‘तू जे बोलत आहेस ते थोडंसं आवर. १८ व्या वर्षी मुलाखतीत ‘सेक्स’ हा शब्द का वापरला? शोभा डे तुझ्याबद्दल वाईट लिहितात.’ आणि मला आठवतंय की खास शोभा डे यांचंच नाव घेतलं जात होतं. तुला बंगाली लोक माहीत आहेत. बंगाली लोकांना बुद्धिमान मानलं जातं, त्यामुळे ते लेखही तसे होते आणि त्या लेखांचा त्रास व्हायचा, लोक बोलायचे त्याचा नाही,” असं सुश्मिता म्हणाली.
सुश्मिताने शोभा डे यांच्या मुलाखतीत मुद्दाम…
यानंतर काही काळाने सुश्मिताने शोभा डे यांची मुलाखत घेतली, ज्यात तिने ‘सेक्स’ हा शब्द मुद्दाम वापरला. “मी जाणीवपूर्वक तो शब्द वापरला होता, कारण मला ‘मिस युनिव्हर्स’ किंवा ‘सर्वात सुंदर व्यक्ती’ व्हायचं नव्हतं तर मला एक मुक्त (स्वतंत्र) व्यक्ती व्हायचं होतं. त्याच प्रयत्नात मी भारताची पहिली मिस युनिव्हर्स बनले. त्या स्वातंत्र्यामुळेच मी ते करू शकले आणि मी ती स्पर्धा जिंकल्यावर प्रत्येकजण त्या स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत होता, कारण बऱ्याच गोष्टींची जबाबदारी माझ्यावर होती,” असं सुश्मिता म्हणाली.
आई-वडिलांना वाटायचं की मी मुलांवर…
“मला खरोखर खूप संघर्ष करावा लागला आणि त्या वेळी काही आई-वडील असेल होते ज्यांना वाटायचं की मी मुलांवर वाईट प्रभाव पाडत आहे कारण मी खूप स्पष्टवक्ती आहे. जर तुम्ही रिजेक्शन जास्त काळ धरून राहिलात तर त्याचा स्वीकार नक्कीच होतो, यावर माझा विश्वास आहे. मी माझ्या आयुष्यात हे खूपदा पाहिलं आहे,” असं सुश्मिताने नमूद केलं.