अभिनेत्री सुश्मिता सेन ही सध्या तिच्या आगामी ‘ताली’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. ‘ताली’ ही वेबसीरिज येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. नुकताच या वेबसीरीजचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या वेबसिरीजचे पोस्टरही प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरच्या माध्यमातून सुश्मिताचा लूक सगळ्यांसमोर आला होता. मात्र, हे पोस्टर पाहिल्यानंतर सुश्मिता सेनला लोक वेगळ्याच नावाने हाक मारू लागले आहेत. एका मुलाखतीत अभिनेत्रीने याबाबतचा किस्सा सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “डोक्यावर टक्कल, हातात बंदूक अन्…”, ‘जवान’साठी फक्त ३० दिवस बाकी, शाहरुख खानने शेअर केलं नवं पोस्टर

एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सुष्मिताने सांगितले की, “जेव्हा माझे ‘ताली’चे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले तेव्हा त्यात माझा अर्धा चेहरा होता आणि मी टाळी मारताना दिसत होते. या पोस्टरच्या खाली अनेकांच्या कमेंट पडल्या होत्या. या कमेंटमध्ये अनेकांनी माझा छक्का म्हणत उल्लेख केला होता. त्या कमेंट वाचून हे सगळे माझ्याबरोबर असं कसं करु शकतात असा माझ्या मनात विचार आला.”

सुश्मिता पुढे म्हणाली, ” माझ्यासाठी अशा शब्दांचा वापर करण्यात आला जे ऐकून मला खूप वाईट वाटलं. “मी ते वैयक्तिकरित्या घेतले. अर्थात मी त्या सर्वांना ब्लॉक केले. पण या गोष्टीमुळे मला जाणवलं की मी फक्त गौरी सावंतचं आयुष्य दाखवत आहे, त्यामुळे मी तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण तिच्याबरोबर जगत आहे.”

हेही वाचा-“तुला घट्ट मिठी आणि…”, ‘रॉकी और रानी’ पाहिल्यावर सई ताम्हणकर भारावली, क्षिती जोगसाठी शेअर केलेली पोस्ट चर्चेत

दरम्यान ‘ताली’ ही वेबसीरिज तृतीयपंथी लोकांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्यावर आधारित आहे. यात सुष्मिता सेन ही प्रमुख भूमिका साकारत आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. तर याचे लेखन क्षितीज पटवर्धन यांनी केले आहे. ही वेबसीरिज जिओ सिनेमावर प्रदर्शित केली जाणार आहे. या वेबसीरिजचे एकूण ६ एपिसोड असतील, असं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushmita sen reveals people called her transgender after taali poster was released dpj