‘मिस युनिव्हर्स’ हा खिताब आपल्या नावावर करून बॉलिवूडमध्ये दणक्यात एन्ट्री घेणाऱ्या अन् या क्षेत्रात प्रचंड यशस्वी झालेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सुश्मिता सेन. अमिताभ बच्चन, गोविंदापासून थेट किंग खान व सलमान खानपर्यंत बड्याबड्या अभिनेत्यांसह सुश्मिताने स्क्रीन शेअर केली. खासकरून गोविंदा व शाहरुखबरोबरची तिची जोडी लोकांना अधिक भावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुखबरोबर सुश्मिताने मोजकेच चित्रपट केले पण त्यापैकी सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे फराह खान दिग्दर्शित ‘मै हूं ना’. पण तुम्हाला ठाऊक आहे का की ‘मै हूं ना’मध्ये शाहरुख खान असणार आहे हे सुश्मिताला ठाऊकच नव्हतं. चित्रपट साईन करेपर्यंत सुश्मिताला या गोष्टीबद्दल अजिबात माहिती नव्हती की तिला शाहरुखच्या बरोबरीचीच भूमिका देण्यात आली आहे. नुकतंच ‘पिंकव्हीला’शी संवाद साधतांना सुश्मिताने या चित्रपटाबद्दल अन् फराह खानबद्दल भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : ’12th Fail’ फेम अभिनेता झाला बाबा! विक्रांत मेस्सीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

मुलाखतीदरम्यान सुश्मिताने फराहबरोबरच्या काही जुन्या आठवणी सांगितल्या. ती म्हणाली, “जेव्हा मी आणि फराह ‘दिलबर दिलबर’ गाण्यासाठी एकत्र चित्रीकरण करत होतो तेव्हा तिने मला विचारलं होतं जेव्हा ती चित्रपट बनवेल तेव्हा मी त्यात नायिका म्हणून करणार का? अन् तेव्हा मीदेखील तिला यासाठी होकार दिला होता.” यानंतर बरीच वर्षे गेली अन् एकेदिवशी फराह खानने सुश्मिताला चित्रपटासाठी ऑफर दिली अन् सुश्मिताही आनंदाने तो चित्रपट करायल तयार झाली.

सुश्मिताला एकेदिवशी फराह खानने मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये बोलावलं. त्याबद्दल सांगताना सुश्मिता म्हणाली, “चित्रपटात कोण हीरो आहे याबद्दल मी तिला विचारलं नव्हतं का तिने मला सांगितलंही नव्हतं. आम्ही फक्त एकमेकींना दिलेलं वचन निभावलं अन् मी फिल्म सिटीमध्ये तिला भेटायला गेले. जेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा चित्रपटात इतर कोणते कलाकार असणार आहेत याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. अन् तिथे शाहरुख खानला पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला. ते माझ्यासाठी एक वेगळंच सरप्राइज होतं.”

एवढं मोठं सरप्राइज दिल्याने सुश्मिताने फराहचे मनापासून आभार मानले शिवाय हा चित्रपट फराहच्या मनाच्या फार जवळ असल्याचंही तिने स्पष्ट केलं. सुश्मिताने मध्यंतरी ‘आर्या’ या वेबसीरिजमधून ओटीटी विश्वात पदार्पण केलं. या सीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमधील सुश्मिताचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून तिने एक वेगळीच भूमिका या सीरिजमध्ये वठवली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushmita sen says farah khan gave her biggest surprise at main hoon na actors meet avn