मिस युनिव्हर्सचा किताब जिंकलेली बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन आज तिचा वाढदिवस साजरा करत असते. ती कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. ती तिच्या चित्रपटाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. सुश्मिता सेन ही ४७ वर्षांची झाली आहे. या निमित्ताने तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

सुश्मिता सेन ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सुश्मिताने तिच्या वाढदिवसाचे निमित्त साधत तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिने निळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. यात ती तिच्या वाढदिवसासाठी फारच उत्साही असल्याचे दिसत आहे.
आणखी वाचा : “त्यांनी मित्राचा बुरखा पांघरला आणि…” घटस्फोटाच्या चर्चांवर मानसी नाईकने पहिल्यांदाच सोडलं मौन

सुश्मिताने तिच्या या फोटोला फारच हटके कॅप्शन दिले आहे. ते कॅप्शन वाचल्यानंतर तिचे अनेक चाहते बुचकळ्यात पडले आहेत. “अखेर ४७!!! हा एक असा नंबर आहे जो मी गेल्या १३ वर्षांपासून फॉलो करत आहे. येणारे वर्ष हे माझ्यासाठी नक्कीच खास आणि अविश्वसनीय असणार आहे. विशेष म्हणजे मला याची फार आधीपासूनच माहिती आहे आणि अखेर आता त्याच्या आगमनाची माहिती देताना मला खूप आनंद होत आहे. आय लव्ह यू, तुमचीच बर्थडे गर्ल”, असे सुश्मिताने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : सुष्मिता सेनने सांगितले सिनेसृष्टीतून १० वर्षांचा ब्रेक घेण्यामागचे कारण, म्हणाली “मला हा निर्णय…”

सुश्मिताच्या या पोस्टनंतर अनेकांना विविध प्रश्न पडले आहेत. सुश्मिता लवकरच तिच्या आयुष्याशी संबंधित एखादी मोठी घोषणा करणार असल्याचे बोललं जात आहे. दरम्यान सुश्मिताच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांचा फारच उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

सुष्मिता सेननं महेश भट्ट यांच्या ‘दस्तक’ चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं होतं. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. विश्वसुंदरीचा किताब पटकवल्यानंतर सुष्मिताने अभिनय क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर आता ती लवकरच ताली या वेबसीरिजद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात ती एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे.

आणखी वाचा : सुष्मिता सेन आणि ललित मोदींच्या रिलेशनशिपवर एक्स बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

या वेबसीरिजवर काम सुरु झालं असून त्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांच्या खांद्यावर असणार आहे. ही वेब सीरिज वूट सिलेक्ट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. या वेबसीरिजचे एकूण ६ एपिसोड असणार आहेत. त्याद्वारे गौरी सावंतच्या आयुष्यातील विविध पैलू प्रेक्षकांसमोर मांडले जाणार आहेत. या वेबसीरिजची निर्मिती अर्जुन सिंग बारान आणि कार्तिक डी निशंदर करत आहेत.