फिटनेस व उत्तम शरीरयष्टी असावी म्हणून अभिनेत्री विशेष मेहनत घेताना दिसतात. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे सुश्मिता सेन. सुश्मिता नियमित व्यायाम व योगा करते. यादरम्यानचे बरेच फोटो व व्हिडीओ ती सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसते. पण आता तिने एक पोस्ट शेअर करत सगळ्यांनाचा दुःखद धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वीच सुश्मिताला हृदयविकाराचा झटका येऊन गेला.
आणखी वाचा – सुश्मिता सेनला हृदयविकाराचा झटका, पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाली, “काही दिवसांपूर्वीच…”
सुश्मिताने तिच्या वडिलांबरोबरचा फोटो शेअर करत ही माहिती दिली. सध्या ती ठिक आहे. पण हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तिला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. शिवाय तिची अँजिओप्लास्टीही करण्यात आली. सुश्मिताने सांगितलेली ही माहिती वाचून सगळ्यांनाच आश्चर्चाचा धक्का बसला आहे.
तिचे चाहतेही चिंतेत पडले आहेत. कमेंट करत तू तुझी काळजी घे, लवकर बरी हो असं नेटकरी सुश्मिताला म्हणत आहेत. याचबरोबर दिग्दर्शक रवी जाधव यांनीही सुश्मिताची ही पोस्ट पाहून कमेंट केली आहे. रवी जाधव म्हणाले, “कृपया तू तुझी काळजी घे. आम्हाला अशीच प्रेरणा देत राहा”.
आणखी वाचा – प्राजक्ता माळीचा पुण्यामध्ये आहे ‘हा’ व्यवसाय, अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली, “अजूनही…”
रवी जाधव यांच्या ‘ताली’ या वेबसीरिजमध्ये सुश्मिता सेन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. याबाबत काही महिन्यांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती. सध्या या वेबसीरिज काम सुरू आहे. या वेबसीरिजचे एकूण सहा भाग असणार आहेत. ही वेबसीरिज ट्रान्सजेंडर एक्टिविस्ट गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित असेल.