बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना त्यांच्या सुपरस्टार आई-वडिलांइतकं या क्षेत्रात यश मिळवता आलं नाही. असाच एक अभिनेता म्हणजे ८० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते संजय खान यांचा मुलगा जायेद खान. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं, पण त्याला फार यश मिळालं नाही. बॉलीवूडमध्ये त्याने अनेक फ्लॉप चित्रपट दिले, पण तरीही तो खूप ऐशोआरामात जगतो आणि त्याची एकूण संपत्तीही एक हजार कोटींच्या आसपास आहे.

जायेद खान आता चित्रपटांपासून दूर आहे, पण तो पत्नी व मुलांबरोबर लक्झरी आयुष्य जगतो. त्याच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्या करिअरबद्दल व नेटवर्थबद्दल जाणून घेऊयात.

अक्षय कुमारच्या सिनेमामुळे बुडाले पैसे, आता तोच धिरज देशमुखांच्या सासऱ्यांच्या मदतीसाठी आला पुढे; जॅकी भगनानी म्हणाला…

जायेद खानचे कुटुंब

५ जुलै १९८० रोजी जायेद खानचा जन्म मुंबईत झाला. त्याचे वडील संजय खान अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता आहेत. त्याच्या आईचं नाव झरीन कत्रक आहे. जायेदला तीन बहिणी आहेत, त्यापैकी एक सुझान खान असून ती हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी आहे. फरदीन खान हा जायेदचा चुलत भाऊ आहे.

पदरात दोन मुलं अन् पस्तिशीत झाली विधवा; अभिनेत्री शांतीप्रियाने सांगितला पती सिद्धार्थ रेच्या निधनानंतरचा कठीण काळ

जायेद खानने २००५ मध्ये मलायका पारेखशी लग्न केलं. मलायका ही अभिनेत्री ईशा देओलची बालपणीची मैत्रीण आहे. जायेदला दोन मुलं आहेत. जायेदने एमबीए केलं असून लंडन फिल्म अकादमीमधून फिल्म मेकिंगचं शिक्षण घेतलं आहे.

जायेद खानचे चित्रपट

जायेद खानने २००३ मध्ये ‘चुरा लिया है तुमने’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. पण त्याला २००५ मध्ये आलेल्या फराह खानच्या ‘मैं हूं ना’ या चित्रपटातून ओळख मिळाली. या चित्रपटात जायेदने शाहरुख खानबरोबर सहायक भूमिका साकारली होती. त्याचबरोबर यात अमृता राव आणि सुष्मिता सेनही होत्या. जायेद खानने आपल्या करिअरमध्ये ‘दस’, ‘वादा’, ‘युवराज’, ‘शब्द’, ‘फाईट क्लब’, ‘रॉकी’, ‘तेज’, ‘अंजाना अंजानी’ असे फ्लॉप चित्रपट दिले. जायेद खानचे एकापाठोपाठ एक सिनेमे फ्लॉप होऊ लागले, मग त्याने अभिनय सोडला.

अपयश आल्याने शशी कपूर यांच्या तिन्ही मुलांनी सोडलं बॉलीवूड, आता काय करतात? जाणून घ्या

जायेद खानची नेटवर्थ

जायेद खानने २०११ मध्ये फ्री एंटरटेनमेंट नावाची निर्मिती कंपनी सुरू केली. ‘लव्ह ब्रेकअप जिंदगी’ हा त्याच्या कंपनीने निर्मिती केलेला पहिला चित्रपट होता. यात दिया मिर्झा व जायेद खानच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट फ्लॉप झाला होता. आता ही कंपनी दुसऱ्या कंपन्यांबरोबर मिळून चित्रपटांची निर्मिती करते व पैसे कमावते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जायेद खान वेगवेगळ्या क्षेत्रात व व्यवसायात गुंतवणूक करतो, त्याचा स्वतःचा बिझनेसही आहे. ‘टाइम्स नाउ’च्या वृत्तानुसार, जायेद खानची संपत्ती १५०० कोटी रुपयांच्या जवळपास आहे. काही ठिकाणी त्याची संपत्ती १००० कोटी असल्याचाही उल्लेख आहे.