Actor Zayed Khan Filmy Career :शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘मैं हूं ना’मध्ये झळकलेला अभिनेता म्हणजे जायेद खान होय. जायेद हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हिचा भाऊ आहे. जायेद बरीच वर्षे रुपेरी पडद्यापासून दूर आहे आणि तो लवकरच पुनरागमन करणार असल्याची चर्चा आहे. जायेदने आता सिनेक्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

जायेद खानने आर्थिक बचतीबाबत त्याचं मत व्यक्त केलं. गरज असेल तितकेच पैसे खर्च करायचे आणि असलेल्या संपत्तीचा दिखावा करायचा नाही, या तत्त्वांवर तो जगत आहे, असं त्याने सांगितलं. १५०० कोटी रुपयांची संपत्ती आहे का? असं विचारल्यावर जायेद हसला. पण मालमत्तेचे व्यवस्थापन करण्याचे महत्त्व माहीत आहे, असं त्याने नमूद केलं.

“मी मनापासून प्रेम केलं,” विवेक ओबेरॉयचं वक्तव्य; म्हणाला, “माझ्या लग्नात एक्स गर्लफ्रेंड्स…”

आर्थिक व्यवस्थापनाबद्दल जायेद म्हणाला…

सुभोजित घोषला दिलेल्या मुलाखतीत सिनेसृष्टीतील चढ-उतार आणि सातत्याने होणारे बदल या गोष्टी लक्षात घेऊन नवोदित कलाकारांना काही आर्थिक सल्ला द्यायचा आहे का? असं जायेदला विचारण्यात आलं. त्यावर तो म्हणाला, “मी तुम्हाला सांगितल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही हा विचार आधी का केला नाही. पण एक म्हण आहे की ‘तुम्हाला फेरारी परवडत असेल तर मर्सिडीज घ्या आणि जर तुम्हाला मर्सिडीज परवडत असेल तर फियाट घ्या’. खरं तर आता आपण सोशल मीडियाच्या युगात आहोत, इथे सोशल मीडियावर तुमची एक इमेज आहे. खूप लोक सोशल मीडियावर दाखवण्यासाठी असं आयुष्य जगतायत जे त्यांना आर्थिकरित्या परवडणारं नाही. काही लोक चांगलं जगत आहेत, पण त्यापैकी ८० टक्के लोक हे अजिबात चांगल्या परिस्थितीत नाहीत. त्यांच्यावर कर्ज आहे, त्यांना ईएमआय भरायच्या आहेत. तरीही ते दिवसेंदिवस फालतू गोष्टी करत राहतात.”

तीन वर्षांपूर्वी मुंबई सोडून दुबईत स्थायिक झाला बॉलीवूड अभिनेता; कारण सांगत म्हणाला, “मी भारतात…”

क्षमता पाहून जगा – जायेद खान

तो पुढे म्हणाला, “तुमची क्षमता पाहून तसंच जगायचा प्रयत्न करा, नुसते शो ऑफ करू नका. अशा गोष्टी करा ज्याचा तुम्हाला फायदा होईल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात बदल होईल. अंथरुण पाहून पाय पसरा. तुम्ही दररोज नवीन कपडे घालण्याची गरज नाही किंवा तुम्ही कुठून आला आहात याबद्दल लाज वाटून घेऊ नका. तुम्ही जसे आहात तसेच राहा. आयुष्यात काही मूर्ख लोक असणारच, त्यांना दाखवण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय का? एक म्हण आहे की, ‘मला माहीत नाही की यशाचा मार्ग काय आहे, पण सर्वांना खुश करणे हा नक्कीच अपयशाचा मार्ग आहे.”

राज कपूर जिच्या प्रेमात होते, तिच्याच मुलीसाठी ‘या’ अभिनेत्याने राज यांच्या लेकीशी लग्न मोडलेलं; अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

विशिष्ट पद्धतीने जगण्याचा दबाव

सध्याच्या काळात एका विशिष्ट पद्धतीने जगण्याचा भयंकर दबाव आहे, असंही जायेदला वाटतं. तरुणांसाठी हे खरंच योग्य आहे की नाही हे माहीत नाही, पण तरुणांनी हिंमत ठेवावी, चारित्र्यवान व्हावं, असं जायेद म्हणाला. त्याने तरुणांना इतरांवर अवलंबून न राहता काम करण्याचा सल्ला दिला.

जायेदच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो शेवटचा २०१५ मध्ये ‘शराफत गई तेल लेने’ मध्ये झळकला होता. नंतर २०१७-१८ मध्ये तो ‘हासील’ या दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमात दिसला होता. आता लवकरच जायेद पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे.