इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा एक जुना व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते करीना कपूरबद्दल बोलत आहेत. करीनाने विमानात चाहत्यांबरोबर केलेली वर्तणूक आपल्याला अजिबात आवडली नव्हती, असं त्यांनी या व्हिडीओत म्हटलं आहे. या व्हायरल व्हिडीओवर हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खानने कमेंट केली आहे.

“कोकण खरंच स्वर्ग आहे, कारण…”, मराठी अभिनेत्रीने शेअर केला खड्ड्यांचा व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “सामाजिक प्रश्नावर…”

नारायण मूर्ती यांचा हा व्हिडीओ जुना आहे. तो आता इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एकदा ते व करीना एकाच विमानाने प्रवास करत होते. यावेळी करीनाने तिच्या चाहत्यांशी ज्या प्रकारे वर्तणूक केली ती त्यांना अजिबात आवडली नाही. “मी लंडनहून परत येत होतो, त्यावेळी करीना कपूर फ्लाइटमध्ये माझ्या शेजारच्या सीटवर बसली होती. अनेक लोक तिच्याजवळ आले आणि हॅलो म्हणाले. पण करीनाने चाहत्यांना उत्तर देण्याची तसदीही घेतली नाही. हे पाहून मी विचारात पडलो. कारण त्यावेळी माझ्याजवळ येणाऱ्यांशी मी बोलत होतो,” असं नारायण मूर्ती त्या व्हिडीओत म्हणताना दिसतात.

अमिताभ बच्चन यांचं महिलांच्या अंतर्वस्त्रांबद्दलचं ‘ते’ ट्वीट व्हायरल, नेटकरी म्हणाले, “तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती”

नारायण मूर्ती यांचा हा व्हिडीओ ‘इ-टाइम्स’ने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर सुझान खानने कमेंट केली आहे. “बरोबर बोललात, मिस्टर मूर्ती” असं तिने कमेंटमध्ये लिहिलं आहे. यासोबत तिने टाळ्या वाजवण्याचा एक इमोजी देखील पोस्ट केला आहे.

sussanne khan
सुझान खानची कमेंट

दरम्यान, करीना कपूरने हृतिक रोशनबरोबर ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘मैं प्रेम की दीवानी हूं’ सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. यादरम्यान करीना कपूर आणि हृतिक एकमेकांना पसंत करत होते, असं म्हटलं जातं. त्यावेळी हृतिक विवाहित होता.

Story img Loader