बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने अलिकडेच समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी गुपचूप कोर्ट मॅरेज केलं. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिने लग्नाची घोषणा केली होती. स्वराचं लग्न चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का होता. दोघांनीही १६ फेब्रुवारीला स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार लग्न केलं. त्यानंतर दोघंही मार्च महिन्यात लग्न करणार आहेत. पण आता लग्नाच्या व्हायरल व्हिडीओनंतर स्वरा भास्कर लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याच्या चर्चां होऊ लागल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वरा भास्करच्या कोर्ट मॅरेजनंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओ जर्नलिस्ट योगेन शाह यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये स्वरा लाल रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. पण या व्हिडीओमध्ये स्वरा बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. यामुळेच स्वरा भास्करला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. स्वरा भास्कर लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याचंही बोललं जात आहे.

आणखी वाचा- स्वरा भास्करने कोर्ट मॅरेज केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट, म्हणाले “फहाद अहमद…”

स्वरा भास्करच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत, ‘प्रेग्नंट आहेस का?’ असा प्रश्न केला आहे. मात्र स्वरा भास्करने यावर अद्याप कोणतही स्पष्टीकरण दिलेलं नाही. युजर्स सातत्याने या व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहेत. याशिवाय १५ दिवसांपूर्वीच स्वराने फहादच्या वाढिदिवशी एक फोटो शेअर करत त्याला भाऊ म्हणत लग्न करण्याचा सल्ला दिला होता. आता लग्नाचं वृत्त समोर आल्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

आणखी वाचा- “बाकी सर्व औपचारिकता…” स्वरा भास्कर-फहाद अहमदसाठी कंगना रणौतचं ट्वीट

दरम्यान स्वरा भास्कर नेहमीच तिच्या चित्रपटांपेक्षा राजकीय वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ते नेहमीच वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवर चर्चा करताना आणि स्वतःचे विचार मांडताना दिसते. अनेकदा ती बिनधास्तपणे आंदोलन करताना दिसली आहे. शाहीन बागच्या आंदोलनात स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांची पहिल्यांदा भेट झाली होती. याचा खुलासा स्वतः स्वरा भास्करने एका व्हिडीओमध्ये सांगितली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swara bhaskar before marriage pregnancy rumours and photo goes viral mrj