बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचा युवानेता फहाद अहमदशी कोर्ट मॅरेज केलं आहे. ६ जानेवारीला स्वरा व फहादने कोर्ट मॅरेज केलं. ट्वीटरवरुन लग्नाचा व्हिडीओ शेअर करत स्वराने चाहत्यांना ही बातमी. त्यानंतर स्वरा व फहादने १६ फेब्रुवारीला गुपचूप साखरपुडा उरकला. आता स्वराची लगीनघाई सुरू आहे.
स्वरा व फहादच्या साखरपुड्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. ‘वुम्पला’ या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये स्वराने कोर्ट मॅरेजबद्दल बोलताना तिच्या लग्नाबाबतही माहिती दिली आहे. “आम्ही मार्चमध्ये लग्न करणार आहोत. पिक्चर अभी बाकी है” असं स्वरा व फहाद व्हिडीओत म्हणत आहेत. स्वरा व फहादचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा>> आधी गुपचूप कोर्ट मॅरेज केलं, आता साखरपुडाही उरकला; स्वरा भास्कर-फहाद अहमदचे फोटो व्हायरल
साखरपुड्यासाठी स्वराने लाल रंगाची साडी व डिझायनर ब्लाऊज असा साधा लूक केला होता. तर फहादने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा व त्यावर लाल रंगाचं जॅकेट परिधान केलं होतं. स्वरा भास्कर व फहादला चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. स्वरा व फहादची पहिली भेट डिसेंबर २०१९ मध्ये एका आंदोलनादरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. प्रेमाच्या शोधात असलेल्या स्वरा व फहादला एकमेकांमध्ये चांगले मित्र भेटले. त्यानंतर भेटीगाठी वाढत गेल्या आणि त्यांच्यातील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.त्यानंतर तीन वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. फहादशी लग्नगाठ बांधत स्वराने नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे.
हेही वाचा>> स्वरा भास्करने दिलेलं पतीच्याच लग्नात येण्याचं वचन; फहाद अहमदबरोबर ‘अशी’ झाली होती पहिली भेट
बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असणाऱ्या स्वराने आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. स्वराचा पती फहाद एक सामाजिक कार्यकर्ता आहे. फहाद सीएएविरोधी आंदोलनात सहभागी झाला होता. समाजवादी पार्टीचा तो युवा नेता आहे.