बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने फेब्रुवारी महिन्यात तिच्या लग्नाबाबत माहिती दिली. स्वराने सोशल मीडियावरुन व्हिडीओ शेअर करत समाजवादी पार्टीचा नेता असलेल्या फहाद अहमदबरोबर लग्न केलं असल्याचं सांगितलं. ६ जानेवारीला स्वरा व फहादने कोर्ट मॅरेज करत सगळ्यांना आनंदाची बातमी दिली. इतकंच नव्हे तर दोघांनी गुपचूप साखरपुडाही उरकला होता. आता पारंपरिक पद्धतीने या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.
स्वरा व फहादच्या लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. ११ मार्च (शनिवार) पासूनच स्वराने तिच्या पारंपरिक लग्न सोहळ्याच्या विधींना सुरुवात केली आहे. संगीत सोहळ्याची तयारी करतानाचा काही व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केले होते. आता स्वरा व फहादच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत.
दिल्लीमध्ये स्वराच्या आजी-आजोबांच्या घरी लगीनघाई सुरू आहे, स्वराने हळदी कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. शिवाय हळदीबरोबरच स्वरा व फहाद होळी खळले असल्याचंही फोटोमध्ये दिसून येत आहे. स्वराने फोटो पोस्ट केल्यानंतर तिच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवाय फुलांचं उत्तम डेकोरेशन फोटोंमध्ये दिसत आहे.
मध्यंतरी या दोघांच्या लग्नपत्रिकेचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. इतकंच नव्हे तर कोर्ट मॅरेज केल्यानंतर स्वराच्या आईने तिला खास सरप्राइज दिलं होतं. स्वरा व फहादच्या हनिमूनसाठी तिच्या आईने एकदम फिल्मी पद्धतीने त्यांच्या रुममध्ये सजावट केली होती. स्वरा व फहादची पहिली भेट डिसेंबर २०१९ मध्ये एका आंदोलनादरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. आता या दोघांच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली आहे.