वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर ही ती विवाह बंधनात अडकल्याचं आज तिने जाहीर केलं. समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमद याच्याशी तिने ६ जानेवारी २०२३ रोजी रजिस्टर पद्धतीने लग्न केल्याचं समोर आलं आहे. स्वराने एक व्हिडीओ पोस्ट करत ही बातमी तिच्या चाहत्यांशी शेअर केली. या व्हिडीओवर कमेंट करत तिचे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. पण अशातच फहाद अहमदशी लग्न केल्याने तिला अनेकांनी ट्रोलही केलं आहे.

स्वरा भास्कर हिनं तिचा नवरा फहाद जिरार अहमद याच्याबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये स्वरानं तिच्या नवऱ्याबरोबरच्या राजकीय रॅलीमधील झलक दाखवली आहे. या व्हिडीओमध्ये स्वरानं फहादबरोबर तिची पहिली भेट कशी झाली, पहिला सेल्फी त्यांनी कसा घेतला याबद्दल सांगितलं आहे. तसंच तिचे आणि फहादचे व्हॉट्सअॅप चॅटही दाखवले आहेत. तसंच स्वरानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोघंजण कोर्टात जाऊन मॅरेज पेपरवर सह्या करताना दिसत आहेत. तसंच एका फोटोत स्वरा तिच्या आईवडिलांच्या गळ्यात पडून रडतानाही दिसत आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा : “माझा हात हातात घेतल्याबद्दल…” स्वरा भास्करचा पती फहाद अहमदचं ट्वीट चर्चेत

हा व्हिडीओ पोस्ट करत स्वराने लिहिलं, “कधीकधी तुम्ही ते जगभर शोधत असता जे तुमच्या अगदी शेजारी असते. आम्ही प्रेम शोधत होतो, परंतु आम्हाला आधी मैत्री सापडली. नंतर आम्हाला एकमेकांची जाणीव झाली. तुझं माझ्या आयुष्यात खूप स्वागत आहे फहाद अहमद.” तिने हा व्हिडीओ पोस्ट करताच नेटकऱ्यांनी यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

हेही वाचा : “आता मला कामं मिळणंही बंद झालंय, कारण…”; स्वरा भास्करने व्यक्त केली खंत

या व्हिडीओवर कमेंट करत एकीकडे तिचे चाहते तिला शुभेच्छा देत आहेत तर दुसरीकडे तिला ट्रोल केलं जात आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिलं, “आता आम्हाला कळलं भाजपा सरकारबद्दल तुझ्या मनात एवढा राग का आहे ते.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “आता कळलं तुला पैसे कोण पुरवतं.” तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “म्हणूनच ती आपल्या देशाबद्दल उलट-सुलट बोलत असते.” तर एकाने लिहिलं ,”हुंडा म्हणून सुटकेस किंवा फ्रिज घेऊन जा. तुझ्या उपयोगी येईल.” आणखी एक जण म्हणाला, “धर्मांतर केल्यानंतर तुझं आता नाव काय आहे?” आता तिची ही पोस्ट फारच चर्चेत आहे.

Story img Loader