बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने १६ फेब्रुवारीला अचानक लग्नाची बातमी देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचा युवा नेता फहद अहमदशी गुपचूप कोर्ट मॅरेज केलं. लग्नानंतर तिने सोशल मीडियावर पतीला टॅग करत चाहत्यांबरोबर ही बातमी शेअर केली. स्वरा भास्करच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. पण याचबरोबर तिचं एक जुनं ट्वीटही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे आणि त्यावरून स्वराला ट्रोल करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वरा भास्करने काही दिवसांपूर्वीच एक ट्वीट केलं होतं. ज्या ट्वीटमध्ये तिने पती फहदला भाऊ असं म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. स्वराचं हे ट्वीट आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या ट्वीटमधील फोटोमध्ये स्वरा फहदबरोबर दिसत आहे. तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “जन्मदिनाच्या शुभेच्छा फहद मिया. भाईचा आत्मविश्वास असाच कायम राहो. आनंदी राहा आणि असंच काम करत राहा. आता वय वाढत चाललंय, लग्न करा. तुझा वाढदिवस आणि हे संपूर्ण वर्ष तुझ्यासाठी चांगलं जाओ मित्रा.”

आणखी वाचा- स्वरा भास्करने साखरपुड्यात नेसली आईच्या लग्नातील साडी; ४० वर्षे जुन्या साडीचा फोटो शेअर करत म्हणाली…

स्वरा भास्करच्या या ट्वीटवर फहदने उत्तर देताना लिहिलेलं, “धन्यवाद जरनवाजी मैत्रिणी. भावाच्या आत्मविश्वासाने झेंडा उंचावला आहे, तो अबाधित राहणे आवश्यक आहे आणि हो, तू माझ्या लग्नाला येशील असे वचन दिले होते, त्यामुळे वेळ काढा, मला मुलगी सापडली आहे.”

आणखी वाचा- Video: “पिक्चर अभी बाकी है” कोर्ट मॅरेज, साखरपुड्यानंतर आता स्वरा भास्करची लगीनघाई, म्हणाली…

आता याच ट्वीटवरून स्वरा भास्करला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे. अनेकांना प्रश्न पडला आहे की एकमेकांना भाऊ-बहीण म्हणून मग हे दोघं लग्न कसं काय करू शकतात. एका युजरने हे ट्वीट शेअर करत कमेंटमध्ये लिहिलं, “तुम्ही दोघांनी कोणता क्रॅश कोर्स केला आहे का? की मागच्या १५ दिवसांत व्हॅलेंटाईनचा परिणाम झाला तुमच्यावर?” तर काही युजर्सनी कमेंटमध्ये विचारलंय, “तुम्ही दोघं तर एकमेकांचे भाऊ-बहीण होता ना.” तर आणखी एका युजरने लिहिलं, “चला तुम्ही दोघं एकमेकांना लग्नाबद्दल विचारत होता आणि आता एकमेकांशीच लग्न केलं. पण जर लग्न करायचंच होतं तर मग त्याला भाऊ का म्हटलं.” याशिवाय काहींनी “आधी भाई होता आता जान झाला.”

दरम्यान फहद अहमदशी लग्न केल्यानंतर स्वराने “कधीकधी तुम्ही ते जगभर शोधत असता जे तुमच्या अगदी शेजारी असते. आम्ही प्रेम शोधत होतो, परंतु आम्हाला आधी मैत्री सापडली. नंतर आम्हाला एकमेकांची जाणीव झाली. तुझं माझ्या आयुष्यात खूप स्वागत आहे फहाद अहमद.” असं ट्वीट करत एक व्हिडीओ शेअर केला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swara bhaskar got trolled for before marriage tweet for husband fahad ahmad mrj