बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर लवकरच आई होणार आहे. सध्या ती तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. गरोदरपणाचा हा काळ ती एंजॉय करत आहे, तसेच ती अनेक फोटोही सोशल मीडियावर शेअर करत आहे. अशातच स्वराने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. या फोटोत तिने परिधान केलेल्या ड्रेसमुळे ती चर्चेत आली आहे. या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीने भगव्या रंगाचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाना पाटेकरांचं खरं नाव माहितीये का? रायगडमध्ये जन्मलेल्या नानांची कौटुंबीक व शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून थक्क व्हाल

स्वरा भास्कर तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. यावर्षी तर ती तिच्या लग्नामुळे खूप चर्चेत राहिली. तिने यावर्षीच्या सुरुवातीला फहाद अहमदशी लग्न केलं. तिने आधी कोर्ट मॅरेज केलं होतं, नंतर मार्च महिन्यात तिने पारंपारिक पद्धतीने लग्न केलं. लग्नानंतर काही महिन्यांनी तिने गूड न्यूज दिली. स्वरा लवकरच आई होणार आहे, सध्या ती तिच्या मॅटर्निटी फोटोशूटमधील काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे.

“तुम्ही आम्हाला हिंदी बोलण्यास…”, हिंदी भाषेवरून प्रकाश राज यांची अमित शाहांवर टीका; कंगना रणौत उत्तर देत म्हणाली…

स्वराने भगव्या रंगाच्या बोल्ड ड्रेसमध्ये हे फोटोशूट केलंय. तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहे.”ग्लॅमरसाठी गरोदरपणाचा काळ इतर कोणत्याही काळाप्रमाणेच चांगला असतो,” असं कॅप्शन स्वराने या फोटोंना दिलं आहे. तिने हे फोटो शेअर केल्यानंतर त्यावर नेटकरी कमेंट्स करत आहेत. अनेकांनी स्वराला शुभेच्छा दिल्या आहेत, तसंच काळजी घे, असंही म्हटलं आहे.

‘भगवा ड्रेस, अंधभक्तांचा किती अपमान करशील स्वरा’, असं एका युजरने म्हटलं आहे. ‘ही सनातनी संस्कृती नाही, थोडी लाज बाळग’, असं एक युजर म्हणाला.

स्वराच्या पोस्टवर नेटकऱ्याची कमेंट (फोटो – स्क्रीनशॉट)
स्वराच्या पोस्टवर नेटकऱ्याची कमेंट (फोटो – स्क्रीनशॉट)
स्वराच्या पोस्टवर नेटकऱ्याची कमेंट (फोटो – स्क्रीनशॉट)

बोल्ड फोटोमुळे स्वराला ट्रोलही केलं आहे. तुझा बुरखा कुठे आहे? अशी कमेंट एका युजरने केली आहे.

स्वराच्या फोटोवर नेटकऱ्याची कमेंट (फोटो – स्क्रीनशॉट)

दरम्यान, स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांची पहिली भेट २०२० मध्ये एका रॅलीदरम्यान झाली होती. दोघांची मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. जोडप्याने यावर्षी मार्चमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले. लग्नाच्या जवळपास ३ महिन्यांनीच स्वराने चाहत्यांना खुशखबर दिली. आता ती लवकरच बाळाला जन्म देणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swara bhaskar maternity photoshoot in bold orange dress netizens comments hrc