बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाते. ती अनेकदा लोकांसमोर आपलं मन मांडताना दिसते. मात्र, तिच्या या स्वभावामुळे तिला अनेकदा कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे. कधी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले, तर कधी जीवे मारण्याची, तर कधी बलात्काराची धमकीही मिळाली. आता या सगळ्याचा परिणाम तिच्या कामावरही दिसून येत आहे. याबद्दल स्वराने दुःख व्यक्त केलं आहे.
तिने नुकतीच ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत स्वरा भास्करने तिच्या करिअरबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं. तिने जाणूनबुजून आपलं करिअर धोक्यात आणलं आहे, असं तिचं स्वतःचं मत असल्याचं तिने सांगितलं.
स्वरा म्हणाली, ‘मला माझं काम सर्वात जास्त आवडतं. मी जाणीवपूर्वक जोखीम घेतली आणि या जोखमीची मोठी किंमत आहे. आता मला मिळायला हवं तेवढं काम मिळत नाहीये. मला मिळालेल्या संधींपेक्षा मी एक चांगली अभिनेत्री आहे आणि मी अधिक चांगलं काम करण्यास सक्षम आहे. माझ्या कारकिर्दीचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला राहिला आहे. मी आतापर्यंत ६ ते ७ सुपरहिट चित्रपटांचा भाग आहे. यासोबतच मी एका वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. समीक्षकांनी माझ्या कामाला कधीही वाईट म्हटलं नाही. पण तरीही आता मला फारसं काम मिळत.
हेही वाचा : “इथे पीडिता हिंसेचा सामना करायला…” ट्रोलिंगबाबत स्वरा भास्करने मांडलं स्पष्ट मत
स्वरा ‘वीरे दी वेडिंग’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘निल बट्टे सन्नाटा’ यांसारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचा भाग आहे. तर आता ती लवकरच ‘मीमांसा’ आणि ‘मिसेस फलानी’ या चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.