‘अकबर’ नावाच्या सिंहाबरोबर ‘सीता’ नावाच्या सिंहिणीला ठेवण्यात आल्याने विश्व हिंदू परिषदेने कोलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वन विभागाच्या या कृत्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील ‘सिलगुडी सफारी पार्क’मध्ये हा वाद झाला आहे. यासंदर्भात अभिनेत्री स्वरा भास्करने एक पोस्ट केली आहे.
‘अकबर’ नावाच्या सिंहाबरोबर ‘सीता’ नावाच्या सिंहिणीला ठेवण्यात आलंय, त्यावर विहिंपने आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणाची बरीच चर्चा होत आहे. याच दरम्यान अभिनेत्री स्वरा भास्करने एक्सवर पोस्ट शेअर करत आक्षेप नोंदवणाऱ्यांची खिल्ली उडवली आहे. “संघींवर आता सिंहांच्या लव्ह जिहादचा धोका आहे. आपण भारतात या अशा मूर्खपणाला मध्यवर्ती स्थान दिलं आहे!” असं स्वराने एक्स पोस्टमध्ये म्हटलंय.
जॅकी-रकुल प्रीतची लगीनघाई! मेहुण्याच्या लग्नासाठी गोव्यात पोहोचले आमदार धिरज देशमुख, पाहा Video
नेमकं प्रकरण काय?
सिलगुडीमधील ‘उत्तर बंगाल वन्यपशू उद्यान’ मध्ये अकबर व सीता नावाच्या सिंहांची जोडी आहे. सिंहाचे नाव अकबर आणि सिंहिणीचे नाव सीता असल्याने विश्व हिंदू परिषदेच्या बंगाल शाखेने त्यावर आक्षेप नोंदवला आहे. यासंदर्भात कोलकाता उच्च न्यायालयाच्या जलपाईगुडी खंडपीठामध्ये १६ फेब्रुवारी रोजी याचिका दाखल करण्यात आली आहे. उद्या २० फेब्रुवारी रोजी या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे.
सिंहिणीच्या ‘सीता’ आणि सिंहाच्या ‘अकबर’ नावावरून वाद, विहिंपची कोर्टात धाव
‘‘सिंहिणीला सीतेचे नाव देण्यात आले आहे. सीता ही जगभरातील हिंदूंसाठी पवित्र देवता आहे. असे कृत्य ईशनिंदा असून हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेवर थेट हल्ला आहे,’’ असा संताप विश्व हिंदू परिषदेने या याचिकेद्वारे व्यक्त केला आहे. या सिंहिणीचे नाव ‘श्रुती’ असं आहे. मात्र ते नंतर बदलून ‘सीता’ ठेवण्यात आलं, असं याचिकेत म्हटलं आहे.