बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या चांगलीच चर्चेत आहे. २३ सप्टेंबरला स्वरानं एका गोंडस मुलीला जन्म दिला. स्वरानं सोशल मीडियावर पोस्ट करीत ही आनंदाची बातमी दिली होती. स्वरा आणि फहाद यांनी आपल्या मुलीचं नाव राबिया, असं ठेवलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत स्वरानं प्रसूतीदरम्यानचा अनुभव शेअर केला आहे.
हेही वाचा- रणबीर कपूर आरोपी नाही, तर…; ईडीने अभिनेत्याला समन्स बजावल्याचं कारण समोर
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत स्वरानं आपल्या प्रसूतीदरम्यानचा अनुभव शेअर केला आहे. स्वरा म्हणाली, “मुलांना जन्माला घालणं म्हणजे बागेत फिरण्याइतकं सोप्पं नाही. बाळाला जन्म देणं हे माझ्याकडून आतापर्यंत करण्यात आलेलं सगळ्यात कठीण काम आहे. पिढ्यान् पिढ्या बायका एवढा त्रास सहन करून बाळांना जन्माला घालतात तेही ‘एपिड्युरल’ (प्रसूतीदरम्यान त्रास होऊ नये म्हणून देण्यात आलेलं इंजेक्शन)चा वापर न करता.”
दरम्यान, जानेवारी महिन्यात अभिनेत्री स्वरा भास्कर समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमद यांच्याबरोबर विवाहबंधनात अडकली होती. एक महिन्यानंतर लग्नाचे फोटो पोस्ट करीत स्वरानं लग्न केल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात स्वरा आणि फहाद यांनी पारंपरिक पद्धतीनं साखरपुडा व लग्न केलं.