बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर गेल्या काहि दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. स्वराने ६ जानेवारीला समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदबरोबर कोर्ट मॅरेज केलं होतं. फेब्रुवारी महिन्यात स्वराने फहादबरोबरचा व्हिडीओ पोस्ट करत लग्न केल्याची गूडन्यूज चाहत्यांना दिली होती. स्वराच्या या पोस्टमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

कोर्ट मॅरेजनंतर स्वरा व फहादने गुपचूप साखरपुडाही उरकला होता. त्यानंतर ते पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा होत्या. स्वरा व फहादच्या लग्नाची पत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. कोर्ट मॅरेजनंत स्वरा व फहादसाठी हळदी, संगीत, मेहंदी व कव्वाली नाईटचं आयोजन केलं होतं. याबरोबरच स्वरा व फहादचा वेडिंग रिसेप्शन सोहळाही नुकताच पार पडला.

हेही वाचा>> “कंगना रणौतचे चित्रपट बघता का?” कौतुकाचा वर्षाव करत संजय राऊत म्हणाले, “ती एक…”

स्वराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पती फहादबरोबरचे रिसेप्शन सोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत. रिसेप्शन सोहळ्यासाठी स्वराने गुलाबी रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला होता. खड्यांच्या ज्वेलरीने नववधू स्वराने साज केला होता. पण या सगळ्यात स्वराच्या मंगळसूत्राने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं. स्वरा व फहादच्या वेडिंग रिसेप्शनमधील फोटोंबरोबरच अभिनेत्रीच्या मंगळसूत्राची सर्वत्र चर्चा आहे.

हेही वाचा>> Video: “मास्क लावून…” स्वरा भास्करच्या रिसेप्शन सोहळ्यातील ‘त्या’ व्हिडीओमुळे जया बच्चन ट्रोल

स्वराच्या मंगळसूत्राची डिझाइनही खास आहे. चेन व दोन वाट्या असलेलं मंगळसूत्र स्वराने घातलं आहे. स्वराच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. “आंध्र मंगळसूत्र” असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “मंगळसूत्र” असं म्हणत इमोजी पोस्ट केले आहेत. “तेलुगु मंगळसूत्र का घातलं आहे?” अशी कमेंटही एकाने केली आहे.

हेही वाचा>> शत्रुघ्न सिन्हांबरोबर अफेअर, पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न अन्…; रीना रॉयशी घटस्फोटाच्या ३३ वर्षांनंतर मोहसिन खान यांनी सोडलं मौन, म्हणाले…

स्वरा व फहादच्या वेडिंग रिसेप्शनसाठी बॉलिवूड सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेते राहुल गांधीही स्वरा व फहादच्या वेडिंग रिसेप्शनला उपस्थित होते. स्वरा व फहादचे रिसेप्शन सोहळ्यातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Story img Loader