अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी जानेवारी महिन्यात कोर्ट मॅरेज केलं होतं. नंतर १६ फेब्रुवारी रोजी त्यांनी व्हिडीओ शेअर करत लग्नाची माहिती दिली व त्याच दिवशी दोघांनी एंगेजमेंट केली होती. आता गेल्या दोन दिवसांपासून स्वराच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. तिने हळदीचे व संगीतचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Oscar Awards 2023: ऑस्कर स्वीकारण्यासाठी मंचावर साडी नेसून पोहोचलेल्या गुनीत मोंगा कोण आहेत?

दरम्यान, स्वराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा ब्रायडल लूक शेअर केला आहे. पण या दोघांनी लग्न केलं नसल्याची माहिती समोर आली आहे. स्वराने लग्नाच्या विधीचे फोटो टाकलेले नाहीत, त्यामुळे स्वरा व फहादने हिंदू किंवा मुस्लीम कोणत्याही पद्धतीने लग्न केलेलं नाही, अशा चर्चा आहेत. ‘इंडिया टुडे’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, “स्वरा व फहादने कोणत्याही विशिष्ट पद्धतीने लग्न केले नाही. दोघांनी हळदी, मेहंदी, संगीत आणि रिसेप्शन यांसारखे फंक्शन्स आयोजित केले होते. त्यांचा हिंदू विवाह किंवा मुस्लीम पद्धतीने निकाह होणार नाही.”

स्वरा व फहादचा वेडिंग लूक (फोटो – स्वरा भास्कर इन्स्टाग्राम)

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर हे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती मेहरून आणि गोल्डन कलरच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. यासोबत तिने मेहरूनचे दागिने कॅरी केले आहेत. हातात मेहेंदी, लाल बांगड्या, नाकात नथ, माथापट्टी आणि केसांत गजरा दिसतोय. स्वरा तेलुगू नवरीप्रमाणे सजली होती.

स्वरा भास्करचा ब्रायडल लूक (फोटो – इन्स्टाग्राम)

फहाद व स्वराने कोर्ट मॅरेज केल्याने दोघेही कोणत्याही विशिष्ट पद्धतीने लग्नगाठ बांधली नाही, असं म्हटलं जातंय. त्यांच्या संगीत व ब्रायडल लूकचे फोटो समोर आले आहेत. पण, त्यांनी लग्न केलेलं नाही. तर, त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन १६ मार्च रोजी दिल्लीत होणार आहे, असं म्हटलं जात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swara bhasker fahad ahmad to ditch traditional hindu muslim wedding hrc