बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने गुडन्यूज दिली आहे. जानेवारी महिन्यात समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदबरोबर विवाहबंधनात अडकलेल्या स्वराला नव्या पाहुण्याची चाहुल लागली आहे. स्वरा गरोदर असून ती लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी स्वराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली होती. आता स्वराचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत स्वराच बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “आम्ही रामायण बनवलंच नाहीये…” ‘आदिपुरुष’चे लेखक मनोज मुंतशीर यांचा मोठा दावा

गरोदरपणाच्या घोषणेनंतर स्वरा भास्कर पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या दिसली. मुंबई विमानतळावरचा स्वराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी तिने काळ्या रंगाचा मिनी ड्रेस परिधान केला होता. तसेच स्वराने पापाराझींना वेगवेगळ्या पोजही दिल्या. या व्हिडीओत स्वराचे बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे.

स्वराच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केली आहे. एका यूजरने लिहिले “ती नेहमीच सुंदर दिसते”. मात्र, काही यूजर्स स्वराच्या प्रेग्नेंसीवरही सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. एका यूजरने “ती लग्नाआधी गर्भवती होती.” असा प्रश्न विचारला आहे.

हेही वाचा- ‘आदिपुरुष’ला होणाऱ्या विरोधात आणखी वाढ; रावणाचा मांस खाऊ घालण्याचा सीन पाहून प्रेक्षक भडकले

स्वरा व फहाद अहमदने जानेवारी महिन्यात कोर्ट मॅरेज केलं होतं. एक महिन्यानंतर फोटो पोस्ट करत स्वराने लग्न केल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात स्वरा व अहमदने साखरपुडा व पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. आता ते लवकरच आईबाबा होणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swara bhasker flaunts baby bump in black short dress at mumbai airport dpj