बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने गुडन्यूज दिली आहे. जानेवारी महिन्यात समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदबरोबर विवाहबंधनात अडकलेल्या स्वराला नव्या पाहुण्याची चाहुल लागली आहे. स्वरा गरोदर असून ती लवकरच आई होणार आहे. स्वराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वरा भास्करने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पती फहाद अहमदबरोबरचा फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये स्वराने तिचा बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे. “कधीकधी सगळ्यांच्या प्राऱ्थना कामी येतात. जीवनाच्या या नव्या टप्प्यावर पाऊल ठेवण्यासाठी आम्ही उत्सुक आणि आनंदी आहोत,” असं स्वराने पोस्टमध्ये म्हटलं आहे. ऑक्टोबर महिन्यात स्वरा व अहमदच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा>> “मी आणि अजितदादाने हा सिनेमा पाहिला”, TDM चित्रपटासाठी सुप्रिया सुळेंची पोस्ट, म्हणाल्या, “बारामतीतील सुपुत्र…”

स्वरा व फहाद अहमदने जानेवारी महिन्यात कोर्ट मॅरेज केलं होतं. एक महिन्यानंतर फोटो पोस्ट करत स्वराने लग्न केल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात स्वरा व अहमदने साखरपुडा व पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. आता ते लवकरच आईबाबा होणार आहेत.