बॉलीवूड अभिनेत्री व मंडी मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत यांना काही दिवसांपूर्वी चंदीगढ विमानतळावर एका सीआयएसएफ महिला सुरक्षारक्षकाने कानशिलात लगावली होती. या घटनेवर राजकीय स्तरावर प्रतिक्रिया उमटल्या होत्या. इतकंच नाही तर सिनेसृष्टीतील अनेकांनी या घटनेचा निषेध केला होता. आता स्वरा भास्करने या हल्ल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत राहणारी स्वरा भास्करने ‘कनेक्ट सिने’शी बोलताना कंगना रणौत यांच्याबरोबर घडलेल्या घटनेबद्दल मत व्यक्त केलं. स्वरा म्हणाली, कंगनाबरोबर जी घटना घडली, ती चुकीचीच होती, असंच कोणताही एक जबाबदार नागरिक म्हणेल. स्वराच्या मते, कंगना यांच्याबरोबर ज घडलं ते चुकीचं होतं आणि ते घडायला नको होते. कोणावरही हल्ला करणे योग्य नाही, असं ती म्हणाली. या घटनेनंतर लोक कंगनाच्या उजव्या विचारसरणीच्या समर्थकांना सांगत होते की त्यांनी याबद्दल बोलू नये, कारण तेच लिंचिंगचं समर्थन करतात, असं स्वराने म्हटलं आहे.

swara bhasker fahad ahmad trolled
स्वरा भास्करच्या नवऱ्यानं सुप्रिया सुळेंसाठी छत्री धरली; सोशल मीडियावर नवरा-बायको दोघंही ट्रोल
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…
uddhav thackeray sada sarvankar
Sada Sarvankar : “आपलं अंगण सोडून दुसऱ्याच्या…”, सदा सरवणकरांच्या ‘त्या’ पोस्टवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा चिमटा

लोकप्रिय अभिनेत्रीने अवघ्या २४ व्या वर्षी घेतलं मुंबईत घर, काही दिवसांपूर्वीच घेतली मर्सिडीज, पूजेचे फोटो केले शेअर

“नुकतीच कंगनाच्या कानशिलात लगावण्यात आली, हे घडायला नको होतं. मात्र किमान ती जिवंत आहे आणि तिच्याभोवती सुरक्षा तरी आहे. या देशात अनेक लोकांचे जीव गेले आहेत, जमावाने मारहाण करून त्यांचे जीव घेतले आहेत, काहींना तर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ट्रेनमध्ये गोळ्या घालून ठार केलं आहे. दंगलीत, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लोकांना मारहाण केल्याच्या नोंदी आहे. जे लोक या सगळ्या गोष्टी जस्टिफाय करत आहेत त्यांनी मग कंगनाच्या घटनेवरून तरी आम्हाला शिकवू नये,” असं स्वरा भास्कर म्हणाली.

सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालची लगीनघाई! अभिनेत्रीचे मामा शत्रुघ्न सिन्हांचं नाव घेत म्हणाले, “आजकालची मुलं…”

स्वरा भास्करने कंगना रणौत यांच्या जुन्या ट्विटचाही उल्लेख केला, ज्यात तिने कान्समधील ऑस्कर सोहळ्यात ख्रिस रॉकला कानशिलात लगावल्याबद्दल विल स्मिथची पाठराखण केली होती. “कंगनाने स्वत: तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर हिंसाचाराचे समर्थन करण्यासाठी केला आहे. यासाठी अभिनेत्रीवर ट्विटरने अनेकवेळा बंदी घातली होती. जेव्हा विल स्मिथने ख्रिस रॉकला झापड मारली तेव्हा तिने त्याचेही समर्थनही केले होते,” असं स्वरा म्हणाली.

बॉयफ्रेंडपेक्षा वयाने मोठी आहे सोनाक्षी सिन्हा, अभिनेत्री ३७ वर्षांची तर झहीर इक्बालचं वय…

कंगना रणौत यांनी या घटनेबद्दल काय म्हटलं होतं?

“मला अनेकजण फोन करत आहेत. मी पूर्णपणे सुरक्षित आहे. सुरक्षा तपासणीदरम्यान चंदीगढमध्ये ही घटना घडली. मी सुरक्षा तपासणीदरम्यान जात असताना दुसऱ्या केबिनमध्ये सीआयएसएफची एक महिला कर्मचारी होती. त्यांनी माझ्या जाण्याची वाट पाहिली, मी पुढे गेल्यावर त्यांनी जवळ येत मला कानशिलात लगावली. मी त्यांना याबाबत विचारलं असता त्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचं म्हणाल्या. पंजाबमध्ये दहशतवाद व उग्रवाद वाढत असून तो कसा रोखायचा?” असा प्रश्न कंगना यांनी व्हिडीओ शेअर करत विचारला होता.