वसईतील २६ वर्षीय तरुणीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याच्या धक्काडायक घटनेनंतर सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजली आहे. आरोपी प्रियकराने मृतदेहाचे तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर तब्बल ६ महिन्यानंतर हे क्रौर्य उघडकीस आलं आहे. सध्या सगळीकडे याच गंभीर गुन्ह्याची चर्चा होत आहे.

मृत तरुणीचं नाव श्रद्धा वालकर असं आहे. तिने प्रियकर आफताब अमीन पूनावाला याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिची हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे. घरच्यांनी आंतरधर्मीय विवाहास नकार दिल्याने दोघेही घर सोडून दिल्लीत राहायला आले होते. पोलिसांनी आरोपी पूनावाला याला अटक केली आहे. तसंच मृतदेहाचे काही तुकडे हाती लागल्याची माहिती दिली आहे.

Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
lure of marriage , pretending to be doctor,
सातारा : डॉक्टर असल्याचे भासवून लग्नाच्या आमिषाने अत्याचार, कराडमध्ये गुन्हा दाखल
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Image of the stampede incident
“आईच्या मृत्यूबाबत मुलीला माहित नाही”, ‘पुष्पा २’ च्या प्रीमियर वेळी झालेल्या चेंगराचेंगरीतील पीडितेच्या पतीची हृदयद्रावक गोष्ट
minor girl posted her video with boyfriend on Instagram
नागपूर : अल्पवयीन प्रेयसीने ‘इंस्टाग्राम’वर व्हिडिओ टाकला अन् प्रियकर अडकला…

आणखी वाचा : “मुलींनी जरा…” श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी अभिनेते शरद पोंक्षे यांची प्रतिक्रिया

या प्रकरणाबद्दल सामान्य व्यक्ति ते सेलिब्रिटी प्रत्येकजण त्यांची चीट व्यक्त करत आहे. एकूणच हे प्रकरण ‘लव जिहाद’शी देखील जोडलं जात आहे. मनोरंजनसृष्टीतूनही यावर कठोर शब्दांत आलोचना केली जात आहे. लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची पीडा व्यक्त करत आहे. अशातच बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिनेदेखील याबद्दल ट्वीट करत मनातील राग बाहेर काढला आहे.

पत्रकार राजडीप सरदेसाई यांचं यासंदर्भातील एक ट्वीट शेअर करत स्वराने लिहिलं की, “हे प्रकरण किती भयानक, भीषण आणि दुःखद आहे. हे व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. त्या मुलीने ज्याच्यावर विश्वास ठेवला तिचा त्याने विश्वासघात केला आहे, मला तिच्याबद्दल प्रचंड वाईट वाटतंय. पोलीस त्यांचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून त्या नराधमाला काठोरातील कठोर शिक्षा मिळेल अशी मी आशा करते.” आपली न्यायव्यवस्था या सगळ्या प्रकरणात नेमका के निर्णय देते याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.

Story img Loader