भारताच्या पदकविजेत्या महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी या कुस्तीपटूंनी केली होती. यासाठी तीन महिन्यांपूर्वी महिला कुस्तीपटू दिल्लीत धरणे आंदोलनाला बसल्या होत्या. मात्र, तेव्हा दिलेलं आश्वासन अद्याप पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा एकदा महिला कुस्तीपटू दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलनाला बसल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुस्तापटूंच्या आंदोलनावर राज्यसभा खासदार व ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनी भारताची प्रतिमा डागाळल्याचा आरोप या महिला कुस्तीपटूंवर केला आहे. तर दुसरीकडे विनेश फोगाटनं कुणीही पाठिंबा देत नसल्याचं सांगत भारतीय क्रीडाविश्वावर परखड सवाल उपस्थित केले आहेत. या सर्व प्रकरणावर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने ट्वीट केलं आहे.

हेही वाचा>> “हे सगळं पाहून मला वेदना होतायत”, नीरज चोप्राची भावनिक पोस्ट व्हायरल; जाहीर केला आंदोलनकर्त्या महिला कुस्तीपटूंना पाठिंबा!

स्वरा भास्करने ट्वीट करत आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे. “पुन्हा…बलात्काऱ्यांना संरक्षण दिलं जात आहे. हे आपलं लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं सरकार आहे. त्यामुळे याला काही प्रमाणात आपणही जबाबदार आहोत,” असं स्वरा भास्करने ट्वीटमध्ये म्हटल आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swara bhasker supports wrestlers protest in delhi against brij bhushan singh kak