Swatantra Veer Savarkar box office Collection Day 1 : रणदीप हुड्डाची मुख्य भूमिका असलेला ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट शुक्रवारी (२२ मार्च रोजी) प्रदर्शित झाला. या चित्रपटाची गेले काही दिवस खूप चर्चा होती. पण या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे पाहता प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. हा चित्रपट हिंदी व मराठी या दोन भाषांमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून त्याने पहिल्या दिवशी किती कमाई केली, याची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाचं दिग्दर्शनही रणदीप हुड्डाने केलं आहे. या त्याचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. यामध्ये अंकिता लोखंडे आणि अमित सियाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अंकिता व रणदीप मागच्या काही दिवसांपासून या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. पण पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे पाहता लोकांनी ‘मडगाव एक्सप्रेस,’ व ‘ओम भीम बुश’ या दाक्षिणात्य चित्रपटाला पसंती दिली आहे. या दोन्ही चित्रपटांनी अनुक्रमे १.५० कोटी व १.२५ कोटींची कमाई केली आहे.

१७ मिनिटांचा किसिंग सीन अन् ब्लॉकबस्टर सिनेमात काम, एकेकाळी ९०० रुपये महिना कमवायची आमिरची हिरोईन, अजूनही आहे अविवाहित

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाने या दोन्हीपेक्षा कमी कमाई केली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने १.१५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाची चर्चा पाहता तो दमदार ओपनिंग करेल, असं म्हटलं जात होतं, पण पहिल्या दिवसाची कमाई फार चांगली नाही. शनिवार व रविवार वीकेंड आणि सोमवारी होळीची सुट्टी असल्याने या चित्रपटाच्या कमाईत वाढ होईल, असे अंदाज वर्तवले जात आहेत.

एका गाण्यामुळे रातोरात स्टार बनली मराठमोळी अभिनेत्री, सहा महिन्यात झालेला घटस्फोट; तर दुसरं लग्नही मोडलं, तिचा पहिला पती…

दरम्यान, ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटावर रणदीप हुड्डा मागच्या काही वर्षांपासून काम करत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी आपलं घर विकल्याचंही सांगितलं होतं. आता या चित्रपटाला वीकेंडला प्रेक्षक मिळतात की मग पहिल्या दिवसाप्रमाणेच कमाई असेल ते लवकरच कळेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swatantra veer savarkar box office collection day 1 randeep hooda movie hrc