‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस झाले आहेत. शुक्रवारी (२२ मार्च रोजी) हिंदी व मराठी या दोन भाषांमध्ये चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात वीर सीवरकर यांचा जीवनप्रवास दाखविण्यात आला आहे. या चित्रपटाच्या पाचव्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहे. वीकेंड व धुलीवंदनच्या सुट्टीच्या दिवशी दिवसाला दोन कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटाचं मंगळवारी कलेक्शन खूप कमी झालं आहे.
‘सॅकनिल्क’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाने शुक्रवारी म्हणजेच पहिल्या दिवशी १.०५ कोटी रुपये कमावले, दुसऱ्या दिवशी २.२५ कोटी व तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी २.७ कोटी रुपयांची कमाई केली. सोमवारी चौथ्या दिवशी चित्रपटाने २.२५ कोटी रुपयांची कमाई केली. पाचव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठी घट झाली. मंगळवारी चित्रपटाचं कलेक्शन १.१० कोटी रुपये झालं. पाच दिवसांत चित्रपटाची देशभरातील एकूण कमाई ९.२८ कोटी रुपये झाली आहे.
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाबद्दल प्रवीण तरडेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन रणदीप हुड्डाने केलं असून मुख्य भूमिकाही त्याने साकारली आहे. याचबरोबर अंकिता लोखंडे आणि अमित सियाल यांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटात वीर सावरकर यांचं वैयक्तिक आयुष्य व त्यांचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग व प्रवास दाखविण्यात आला आहे.