‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट २२ मार्च रोजी हिंदी व मराठी दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर २० दिवस पूर्ण झाले आहेत. २० दिवसात या चित्रपटाने समाधानकारक कामगिरी केली आहे. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची आकडेवारी समोर आली आहे, त्यानुसार त्याने २० कोटींहून जास्त कमाई केली आहे. अशातच या चित्रपटाचं बजेट किती आहे, त्याबाबत जाणून घेऊयात.

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटात रणदीप हुड्डाने मुख्य भूमिका साकारली असून दिग्दर्शनही त्यानेच केलं आहे. वीर सावरकर यांचा जीवन प्रवास सांगणारा ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा सिनेमा तयार करण्यासाठी आपल्याला वडिलांची मालमत्ता विकावी लागली, असं रणदीप मुलाखतीत म्हणाला होता. वडिलांनी मुंबईत घेतलेली मालमत्ता विकून या चित्रपटाची निर्मिती केली, असं रणदीपने सांगितलं. त्याच्या या विधानाची व चित्रपटाची खूप चर्चा आहे, अशातच चित्रपटाचं बजेट किती? असा प्रश्न अनेकांना पडत आहे.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
issue of ministery post between Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar is likely to be resolved in Delhi
खातेवाटपाचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
amazon smbhav 2024 nitin gadkari
देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणणार – नितीन गडकरी
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट प्रदर्शित होऊन २० दिवस पूर्ण, एकूण कलेक्शन किती? जाणून घ्या

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटासाठी रणदीप हुड्डा व इतर निर्मात्यांनी मिळून २० कोटी रुपयांचा खर्च केला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ च्या वृत्तानुसार, या चित्रपटाचं बजेट २० कोटी रुपये आहे आणि बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने तीन आठवड्यांत २१.९ कोटी रुपयांची कमाई केली आहे, यासंदर्भात इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ने वृत्त दिलं आहे.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटासाठी वडिलांची मालमत्ता विकली, रणदीप हुड्डाचा खुलासा; म्हणाला, “मी खूप…”

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहता निर्मात्यांनी खर्च केलेली रक्कम तरी नक्कीच वसूल केली आहे. चित्रपट अजूनही काही ठिकाणी सिनेमागृहांमध्ये दाखवला जात आहे. त्यामुळे चित्रपटाच्या एकूण कलेक्शनमध्ये वाढ होऊ शकते. या चित्रपटात रणदीप हुड्डासह अंकिता लोखंडे व अमित सियाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Story img Loader