बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डाला ‘वन्स अपॉन अ टाईम’ आणि ‘हायवे’ यांसारख्या चित्रपटांमुळे प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये रणदीप झळकला. आता तो ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनयाबरोबरच या चित्रपटाचे रणदीपने लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा हिंदी ट्रेलर ४ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. तर आज (११ मार्च रोजी) या चित्रपटाचा मराठी ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या निमित्ताने आणि चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणदीप हुड्डा आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या हॉस्टेलमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या खोलीला भेट दिली.

हेही वाचा… “श्रीमंत मुलगी म्हणजे गोरी अन्…”, मनोरंजनसृष्टीत होणाऱ्या रंगभेदावर क्रांती रेडकरचं परखड मत; म्हणाली…

चित्रपटाबद्दल प्रेक्षकांशी संवाद साधताना अंकिता लोखंडे म्हणाली, “जेव्हा माझ्याकडे ही स्क्रिप्ट आली आणि मला माहीत पडलं की मला वीर सावरकरांच्या पत्नीची म्हणजेच यमुनाबाईंची भूमिका साकारायची आहे, तेव्हा मला खरंच माहीत नव्हतं त्या कोण होत्या. कारण वीर सावरकरांबद्दल मला इतक्या डिटेलमध्ये कधीचं माहीत नव्हतं. या चित्रपटासाठी मी रणदीपला भेटले, त्याच्याबरोबर बसले. त्याने मला पाहिलं आणि म्हणाला, मला नाही वाटतं की या चित्रपटामध्ये मला तू हवी आहेस. मग मी आश्चर्यचकित होऊन त्याला विचारलं, पण असं का? यावर रणदीप म्हणाला, तू या पात्रासाठी जास्त सुंदर आहेस. मग मी म्हणाले, कृपया तू असं म्हणू नकोस.”

अंकिता पुढे म्हणाली, “या चित्रपटासाठी ज्याप्रकारे रणदीपने संशोधन केलं होतं, मला काही करायची गरजच पडली नाही. त्याला माहीत होतं की, या चित्रपटात त्याला काय हवय. नंतर मी स्वत: यमुनाबाईंबद्दल पुष्कळ वाचलं. त्यांचं योगदान काय होतं, त्यांचं काम कसं होतं, त्यांनी त्यांच्या पतीला कसा आधार दिला, या सगळ्याची माहिती मिळवली. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हणतात, तशाच यमुनाबाई वीर सावरकरांच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या.”

हेही वाचा… सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली कियारा अडवाणी; ‘या’ व्यक्तीबरोबर खास फोटो शेअर करत म्हणाली, “मला माझ्या…”

दरम्यान, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल सांगायचं झाल्यास, हा चित्रपट विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन, सह-लेखन आणि सह-निर्मिती रणदीप हुड्डा याने केली आहे. रणदीप यात वीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री अंकिता लोखंडे वीर सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swatantryaveer savarkar marathi trailer out ankita lokhande in yamunabai role dvr