बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता लवकरच ‘जवान’ या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो अलीकडेच अभिनेत्याने ‘आस्क एसआरके’ (#AskSRK)सेशन घेतले. या वेळी शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी काही प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांना शाहरुखने भन्नाट उत्तरे दिली आहेत.

अशाच एका चाहत्याने शाहरुखला “जेवलास का?” असा प्रश्न विचारला आणि शाहरुखने त्याच्या नेहमीच्या हटके स्टाईलमध्ये त्याला उत्तर दिलं. शाहरुख ट्वीटमध्ये म्हणाला, “तू स्विगीमध्ये आहेस का? मला काहीतरी पाठवशील का?” एक चाहता आणि शाहरुख खान यांच्या या संभाषणामध्ये आता स्विगीने बाजी मारल्याचं समोर येत आहे.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
Loksatta lalkilla Amit Shah statement of Congress defeat
लालकिल्ला: अमित शहांचे काँग्रेस पराभवाचे सत्यकथन!
Rohit Sharma Statement on Mohammed Siraj and Travis Head Fight in IND vs AUS 2nd Test
IND vs AUS: “मर्यादा ओलांडायला नको…”, रोहित शर्माने सिराज-हेडच्या वादात भारतीय गोलंदाजाची घेतली बाजू, सामन्यानंतर केलं मोठं वक्तव्य
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मी होतो तरीही…”

आणखी वाचा : १५ कोटींचं बजेट, ९१२ कोटींचा व्यवसाय; ‘पठाण’, ‘RRR’, किंवा ‘दंगल’ नव्हे तर ‘हा’ आहे सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

शाहरुखचं हे ट्वीट पाहून स्विगीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शाहरुखला विचारलं, “आम्ही स्विगीमधून आहोत, काही पाठवू का?” शाहरुखने या ट्वीटचं उत्तर दिलं नाही, पण काही वेळाने स्विगीने आपल्या डिलिव्हरी बॉइजचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत ही मुलं शाहरुखचं घर मन्नतच्या बाहेर उभी आहेत. याबरोबरच स्विगीने लिहिलं की, “आम्ही स्विगीकडून आलो आहोत तुमच्यासाठी जेवण घेऊन.”

स्विगीच्या या ट्वीटची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा आहे. काहींनी झोमॅटोचीटर उडवली तर काहींनी स्विगीच्या या फास्ट डिलिव्हरीची प्रशंसा केली. आता शाहरुखने स्विगीची ही ऑर्डर घेतली की नाही याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, शाहरुख खानचा बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा शाहरुखबरोबर प्रमुख भूमिका साकारणार आहे. जवान ७ सप्टेंबर २०२३ रोजी रिलीज होणार आहे.

Story img Loader