कायम हटके आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारे चित्रपट देणारी तापसी पन्नू ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मसालापट केल्यानंतर तापसीने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली अन् तिच्या लोकप्रियतेमध्ये आणखी भर पडली. अभिनयाबरोबरच तापसीने निर्माती म्हणूनही काम सुरू केलं. निर्माती म्हणून तिचा दूसरा चित्रपट ‘धक धक’ सध्या चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, प्रेक्षकांनी याला चांगला प्रतिसाद दिला, पण आता हा चित्रपट आणि निर्माती तापसी पन्नू एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तापसी या चित्रपटाच्या सह निर्मात्यांमुळे नाराज झाली असून तिने तिची नाराजी व्यक्त देखील केली आहे.

आणखी वाचा : रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाबद्दल मोठी अपडेट; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार सनी देओल?

चित्रपटाची मार्केटिंग स्ट्रॅटजी व व्हायाकॉम १८ कडून चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी होणारी घाई यामुळे तापसी नाखुश असल्याचं मीडिया रीपोर्टनुसार समोर येत आहे. ट्रेलर प्रदर्शनाच्या चार दिवस आधीच तापसीने चित्रपटाची निगडीत सगळ्या पोस्ट आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन डिलिट केल्या व स्वतःला या चित्रपटापासून व याच्या प्रमोशनपासून वेगळं केलं.

हिंदुस्तान टाइम्सची संवाद साधताना तापसी म्हणाली, “मी आत्ता याविषयी काहीच बोलू शकत नाही. मी चित्रपटाची वाट पाहत आहे, प्रेक्षक या चित्रपटाला कसा प्रतिसाद देतील यासाठी उत्सुक आहे. मला कोणतीही नकारात्मक आसपास नको आहे.” चित्रपटाचे सहनिर्माते हे याकडे तितक्या गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोपही तापसीने केला आहे. ‘धक-धक’ ही चार महिलांच्या मैत्रीची आणि सेल्फ डिस्कव्हरीची गोष्ट आहे. या चित्रपटात रत्ना पाठक शाह, दिया मिर्झा, संजना सांघी व फातीमा सना शेख या चौघी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.