तापसी पन्नूने तिचा प्रियकर मॅथियास बो याच्याशी २३ मार्च रोजी उदयपूरमध्ये लग्न केलं. तिच्या लग्नाला दोघांचे कुटुंबीय व मोजकेच मित्र उपस्थित होते. लग्नाला जवळपास २० दिवस झाल्यानंतर पहिल्यांदाच तापसीने आपलं लग्न गुपित का ठेवलं याबाबत माहिती दिली आहे.

तापसी आणि मॅथियास यांनी लग्न केलं, पण त्याबद्दल सोशल मीडियावर फोटो शेअर केला नाही. तसेच इंडस्ट्रीतील मोजकेच लोक तिच्या लग्नाला उपस्थित होते. त्यामुळे तिच्या लग्नाबाबत फारशी कुणालाच माहिती नव्हती. आता तापसीने लग्न गुपित का ठेवलं, याबाबत खुलासा केला आहे. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तापसी म्हणाली, “मला माहित नाही की मी माझं वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक करावं की नाही. कारण लोक खूप लवकर जजमेंट्स देतात. मी आयुष्यात याच रितीने पुढे गेले आहे. माझा जोडीदार किंवा लग्नात सहभागी झालेले लोक नाही. त्यामुळे माझं लग्न मी स्वतःपुरतं ठेवलंय.”

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला

तापसी पन्नूने बॉयफ्रेंडशी उदयपूरमध्ये गुपचूप उरकलं लग्न, मित्राने शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चांना उधाण

तापसी पुढे म्हणाली, “माझ्या लग्नाची माहिती लपवून ठेवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. पण फक्त त्याचीच चर्चा होईल, असा सार्वजनिक सोहळाही मला नको होता. त्यामुळे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करण्याचा माझा कोणताही विचार नाही आणि त्यासाठी मी अजुन मानसिकदृष्ट्या तयार आहे असं मला वाटत नाही. मला माहित आहे की जे लोक माझ्या लग्नात हजर होते ते माझ्यासाठी तिथे आले होते, मी जे करतेय त्यावर त्यांचं मत देण्यासाठी नाही. त्यामुळे मी निवांत होते.”

अवघ्या २० कोटींचं बजेट अन् कमावले २२५ कोटी, एकही अभिनेत्री नसलेला ‘हा’ सिनेमा ओटीटीवर होणार प्रदर्शित

लग्नातील सर्व जबाबदाऱ्या कोणी पार पाडल्या व तयारी कोणी केली याबाबत तापसीने सांगितलं. “माझी बहीण शगुन पन्नूने लग्नाचे सर्व कार्यक्रम सांभाळले. माझ्या लग्नाचे सर्व नियोजन मी तिच्यावर सोपवले होते. माझ्या लग्नात खूप कमी लोक होते, त्यामुळे मला फार काळजी नव्हती,” असं तापसी म्हणाली.

Story img Loader