अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या लव्ह लाइफबद्दल भाष्य केलं आहे. ती बॅडमिंटनपटू मॅथियस बोबरोबर दहा वर्षांपासून रिलेशनशिप आहे, परंतु ती तिच्या नात्याबद्दल फारसं बोलत नाही. तापसीने तिचं नातं कधीच लपवलं नाही. आता नुकत्याच एका मुलाखतीत तापसीला डेटिंगबद्दल विचारण्यात आलं. त्यावर तिने तिच्या रिलेशनशिपचा उल्लेख केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेलिब्रिटी झाल्यानंतर डेटिंग करणं कठीण आहे का? असं विचारल्यावर तापसी म्हणाली की ती १० वर्षांपासून एकाच व्यक्तीसोबत आहे म्हणून याचं उत्तर काय द्यावं हे तिला कळत नाही. राज शामानीशी बोलताना तापसी म्हणाली, “गेल्या १० वर्षांपासून मी त्याच व्यक्तीसोबत आहे, मी १३ वर्षांपूर्वी अभिनय करायला सुरुवात केली आणि ज्या वर्षी मी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं, त्याच वर्षी मी त्याला भेटले आणि तेव्हापासून मी त्याच्यासोबत आहे. माझा त्याला सोडण्याचा किंवा इतर कोणासोबत राहण्याचा कोणताही विचार नाही कारण मी नात्यात खूप आनंदी आहे.”

२१.२ मिलियन प्रेक्षकांनी २०२३ मध्ये ओटीटीवर सर्वाधिक पाहिला ‘हा’ वादग्रस्त बॉलीवूड चित्रपट; तुम्ही बघितलाय का?

काही महिन्यांपूर्वी तापसीने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन ठेवलं होतं. तेव्हा एका चाहत्याने तिला विचारलं की ती कधी लग्न करणार आहे. यावर तापली म्हणाली होती “मी अद्याप गरोदर नाही, त्यामुळे इतक्यात तरी नक्कीच लग्न करणार नाही. लग्नाबद्दल मी तुम्हा सर्वांना कळवेन.” तिने सांगितलं होतं की ती फक्त एका दिवसात लग्न करेल, तिच्या लग्नाचा सोहळा खूप मोठा नसेल. “मला जेव्हा मुलं हवी असतील तेव्हाच मी लग्न करेन,” असंही तापसी म्हणाली होती.

जुही चावलाची लेक दिसते फारच सुंदर, पण तिला व्हायचं नाही अभिनेत्री, जान्हवी मेहताला ‘या’ क्षेत्रात करायचंय करिअर

तापसी व मॅथियस दोघेही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांच्या नात्याला आता १० वर्षे झाली आहेत. आपण एकमेकांसाठी वेळ काढतो, असं तापसीने सांगितलं होतं. तापसीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taapsee pannu dating badminton player mathias boe for 10 years says too happy in relationship hrc