तापसी पन्नू सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. तिने बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तापसी पन्नू मुक्तपणे कोणत्याही मुद्द्यावर भाष्य करत असते. माध्यमांसमोर केलेल्या वक्तव्यांमुळे ती अनेकदा अडचणीत सापडली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये तिचा ‘दोबारा’ हा सस्पेन्स थ्रिलरपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान सर्वत्र बॉयकॉटचे वातावरण होते.

दिल्लीमधील एका कार्यक्रमामध्ये तापसीने हजेरी लावली होती. या कार्यक्रमामधला तिचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये ती ‘गोलगप्पे’ या पदार्थाचा आस्वाद घेत असल्याचे दिसत आहे. तापसी पन्नू मुळची नवी दिल्लीची आहे. त्यामुळे तिला दिल्लीतील फास्ट फूडमध्ये मोडणारे सर्व पदार्थ फार प्रिय आहेत. एचटी सिटी आयोजित कार्यक्रमामध्ये तिला आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाची थीम खाद्यसंस्कृती असल्याने तिने तेथील चविष्ठ पदार्थांवर यथेच्छ ताव मारला.

आणखी वाचा – ‘कॉफी विथ करण’मधील शाहरुखच्या अनुपस्थितीविषयी करण जोहरने सोडलं मौन; म्हणाला “तो या कार्यक्रमाचा…”

गोलगप्पे खात असताना तिला ‘तुला आता पाणीपुरीची आठवण येत असेल ना?’ असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तिने ‘मी मुंबईमध्ये गोलगप्पे खात नाही’ असे उत्तर दिले. पुढे ती म्हणाली, “एक तर मुंबईमध्ये पाणीपुरी असते, तिथे गोलगप्पे मिळत नाही. मुंबईतील पाणीपुरी खाण्यालायक नसते असे मला वाटते” दिल्लीमधील जवाहरलाल नेहरु स्टेडिअममध्ये आयोजित या कार्यक्रमामध्ये तापसीव्यतिरिक्त अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

आणखी वाचा – “निर्मिती सावंत यांच्याबरोबर…” श्रेया बुगडेने सांगितली तिची बकेट लिस्ट

या वर्षामध्ये तापसीचे ‘शाबाश मिठू’ आणि ‘दोबारा’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ या आगामी चित्रपटामध्ये ती दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती शाहरुख खानसह पहिल्यांदा ऑनस्क्रीन काम करणार आहे.

Story img Loader