बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या अनोख्या भूमिकांमुळे चर्चेत असते. २०१३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘चश्मे बद्दूर’ या चित्रपटातून तापसीने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. अलीकडेच ‘डंकी’ या चित्रपटात झळकलेली ही अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

एन डी टीव्हीच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्री तापसी पन्नू तिचा बॉयफ्रेंड मॅथियास बोबरोबर लग्न करणार आहे. मॅथियास बो हा बॅडमिंटन खेळाडू असून तो डेन्मार्कचा रहिवासी आहे. तापसी आणि मॅथियास १० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. वृत्तानुसार, मार्चच्या अखेरीस उदयपूरमध्ये संपूर्ण कुटुंबासमवेत दोघांचा लग्नसोहळा पार पडेल आणि या लग्नाला कोणत्याही बॉलीवूड कलाकारांना आमंत्रित केले जाणार नाही असं म्हटलं जातंय.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा… लंडनमध्ये लेक वामिकासह विराट कोहली दिसला एकत्र, फोटो झाला व्हायरल; नेटकरी म्हणाले, “अनुष्का…”

तापसी आणि मॅथियासचं लग्न शीख आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने होण्याची शक्यता आहे. एन डी टीव्हीनुसार, हे जोडपे शीख आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्मांच्या परंपरा आणि संस्कृती जपत भव्य लग्नसोहळा पार पाडणार आहेत. तापसी पन्नू आणि मॅथियास बो जवळजवळ १० वर्षे एकमेकांना डेट करत आहेत. तापसी अनेकदा मुलाखतींमध्ये आणि सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने बोलली आहे.

‘ब्राईड्स टुडे’ला दिलेल्या जुन्या मुलाखतीत तापसी म्हणाली होती की, “मला एकदिवसीय लग्नसोहळा करायचा आहे, ज्यात कलर पॅलेट न्यूड आणि फिकट रंगाचा असेल. माझं लग्न एकदम बेसिक आणि ड्रामा फ्री असायला हवं, कारण तसंही माझ्या प्रोफेशनल आयुष्यात आधीच खूप ड्रामा आहे आणि हा ड्रामा मला माझ्या वैयक्तिक आयुष्यात नकोय.” तापसी रात्री उशिरापर्यंत लग्नाचे कोणतेही विधी करणार नाही, असंही म्हणाली होती.

हेही वाचा… VIDEO: फेकल्या चपला, दगड अन्…; अक्षय कुमार-टायगर श्रॉफच्या कार्यक्रमात चाहत्यांचा मोठा गोंधळ; पोलिसांकडून लाठीचार्ज

वेडिंग लूकबद्दल बोलताना तापसी म्हणाली होती, “जेव्हा ब्राईड्स हेवी मेकअप करतात तेव्हा मला अतिशय वाईट वाटतं. जर तुमच्या लग्नाच्या फोटोजमध्ये तुम्ही इतके वेगळे दिसत असाल तर तुम्ही कसं काय एन्जॉय करू शकाल. या आठवणी काही क्षणांपुरत्या नसून त्या कायमच्या असतात.”

हेही वाचा… तब्बल तीस वर्षांनंतर माधुरी दीक्षितने रिक्रिएट केला ‘हम आपके है कौन’चा खास लूक, पाहा व्हिडीओ

दरम्यान, तापसीच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘डंकी’ या चित्रपटात तापसी पन्नू शाहरुखसह प्रमुख भूमिकेत दिसली होती. यात विकी कौशल, बोमन इराणी, अनिल ग्रोवर, विक्रम कोचर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘वो लडकी है कहा’ या आगामी चित्रपटात तापसी पन्नू ‘स्कॅम १९९२’ फेम अभिनेता प्रतिक गांधी याच्याबरोबर झळकणार आहे.

Story img Loader