कायम हटके आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारे चित्रपट देणारी तापसी पन्नू ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मसालापट केल्यानंतर तापसीने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली अन् तिच्या लोकप्रियतेमध्ये आणखी भर पडली. अभिनयाबरोबरच तापसीने निर्माती म्हणूनही काम सुरू केलं. निर्माती म्हणून तिचा दूसरा चित्रपट ‘धक धक’ सध्या चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटाच्या प्रमोशन स्ट्रॅटजीबाबत तापसी फारसी खुश नसल्याने तिने या चित्रपटाचं प्रमोशन न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या चित्रपटाच्या निर्मात्यांचाही यावर फारसा विश्वास नसल्याने तापसी त्यांच्यावर नाराज आहे. आता हा चित्रपट महिलांविषयी भाष्य करणारा असल्याने हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार नाही अशी चर्चा इंडस्ट्रीत सुरू आहे आणि यावरच तापसीने तिचं मत मांडलं आहे.

आणखी वाचा : Sam Bahadur Teaser: “आर्मी हेच माझे जीवन…” विकी कौशलच्या बहुचर्चित ‘सॅम बहादुर’चा टीझर प्रदर्शित

‘इ-टाइम्स’शी संवाद साधताना तापसीने याबद्दल नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली की तिचा चित्रपट शाहरुख खानच्या ‘जवान’ इतका मोठा नसेल, परंतु अशा छोट्या चित्रपटांनाही योग्य ती संधी व प्रोत्साहन मिळायला हवं यावर तापसीने जोर दिला. याबरोबरच इंडस्ट्रीच्या ‘स्टार सिस्टम’वरही तापसीने परखड भाष्य केलं.

तापसीची निर्मिती असलेला ‘धक-धक’या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ही चार महिलांच्या मैत्रीची आणि सेल्फ डिस्कव्हरीची गोष्ट आहे. या चित्रपटात रत्ना पाठक शाह, दिया मिर्झा, संजना सांघी व फातीमा सना शेख या चौघी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taapsee pannu speaks about bollywood always favoring stars avn
Show comments