तापसी पन्नू आणि कंगना रणौत या दोघींमध्ये कोणत्या ना कोणत्या विषयावर वाद सुरूच असतो. दोन वर्षांपूर्वी कंगना व तापसीमध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. कंगनाने तापसीला ‘सस्ती कॉपी’ म्हटलं होतं, तर दुसरीकडे तापसीने कंगनाला डबल फिल्टर वापरण्याचा सल्ला दिला होता. आता पुन्हा एकदा तापसीला कंगनाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“भारतातील मुली आळशी आहेत” म्हणणाऱ्या सोनाली कुलकर्णीवर नेटकऱ्यांचा संताप; म्हणाले, “नोकरी करणाऱ्या स्त्रिया…”

‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत तापसीला ‘सस्ती कॉपी’ विधानाबद्दल विचारण्यात आलं. “मी खरंच या विधानावर काय बोलू. आता मला वाईटही वाटत नाही. खरंच, मला माहीत नाही. मी तिला ‘पिंक’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या वेळी भेटले होते, तेव्हा मी इंडस्ट्रीत नवीन होते, त्यावेळी मी तिला पाहुण्यासारखं ‘हॅलो’ म्हटलं होतं आणि तिने ‘धन्यवाद’ म्हटलं होतं,” अशी आठवण तापसीने सांगितली.

ती पुढे म्हणाली, “जर ती माझ्यासमोर आली ती मी तिच्याशी बोलेन. तोंड फिरवून जाणार नाही. मला तिच्यामुळे कोणतीच अडचण नाही, तिलाच आहे, त्यामुळे तिची मर्जी. सुरुवातील मला झटका बसला होता, कारण ती चांगली अभिनेत्री आहे. जेव्हा तिने मला सस्ती कॉपी म्हटलं होतं, तेव्हाही मी ते कौतुक म्हणून घेतलं होतं.”

“मुलगा हवाय की मॉलमधील ऑफर?” लग्नासाठी अवाजवी अटी ठेवणाऱ्या मुलींना सोनाली कुलकर्णीने सुनावलं; म्हणाली, “ऐशोआराम पाहिजे तर…”

दरम्यान, तापसी शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटात दिसणार आहे, त्याशिवाय तिचा ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taapsee pannu talks about kangana ranaut sasti copy remark say she has problem hrc