अभिनेत्री तापसी पन्नूने या वर्षी मार्चमध्ये बॅडमिंटनपटू मॅथियास बोबरोबर गुपचूप लग्नगाठ बांधली. उदयपूरमध्ये नातेवाईक व जवळच्या काही खास मित्र-परिवारांसमवेत तापसीचा हा लग्नसोहळा पार पडला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या लग्नातील काही गोष्टींबद्दल खुलासा केला आहे.

तापसीने तिच्या या खास दिवशी इतर अभिनेत्रींसारख्या लेहेंग्याची निवड न करता पारंपरिक सलवार कमीजची निवड का केली? असा प्रश्न तिला ‘एच टी सीटी’ला दिलेल्या मुलाखतीत विचारला. यावर तापसी म्हणाली, “मी शीख, गुरुद्वारातील लग्न पाहून मोठी झाले आहे, त्यामुळे माझ्यासाठी लग्नाच्या वेळेच्या पोशाखाची कल्पना म्हणजे लाल सलवार कमीज आणि सोनेरी रंगाची बॉर्डर असलेली ओढणी. मी हे सगळं बघत आल्यामुळे मला माहीत होतं की, याच कपड्यात नववधू होण्याची ती खास भावना आहे आणि जर मी इतर अभिनेत्रींसारख्या पेस्टल रंगाच्या लेहेंग्याची निवड करून लग्न केलं असतं तर मला ती भावना आलीच नसती, असं मला वाटतं.”

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ

हेही वाचा… “तुझं करिअर संपेल,” एका सहकलाकाराने परिणीती चोप्राला ‘चमकीला’ चित्रपट न करण्याचा दिलेला सल्ला; अभिनेत्री म्हणाली…

तापसी पुढे म्हणाली, “जर कोणत्या सुप्रसिद्ध डिझायनरने माझे कपडे डिझाइन केले असते तर माझ्या लग्नाची बातमी मोठ्या प्रमाणात लिक होण्याची शक्यता होती आणि मला माझं लग्न खाजगी ठेवायचं होतं. म्हणून माझी कॉलेजमधली मैत्रीण, मनी भाटिया हिने माझे सगळे आउटफिट्स मला हवे तसे डिझाइन केले. माझ्या लग्नातील कोणत्याच कार्यामध्ये मी लेहेंगा घातला नव्हता, कारण मला खूप नाचायचं होतं.”

तापसीच्या लग्नसोहळ्यातील अन्य आउटफिट्सबद्दल बोलायचं झाल्यास, हळदीसाठी अभिनेत्रीने पंजाबी स्टाईलची लुंगी आणि कुर्ता परिधान केला होता. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटात जसा आहे तसाच. तर संगीतसाठी तापसीने बेल-बॉटम पॅन्ट, टॉप आणि जॅकेटची निवड केली होती.

हेही वाचा… VIDEO: ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुन-सायली आणि चैतन्य-साक्षीने केला साखरपुड्यादिवशी मजेशीर डान्स; चाहते म्हणाले, “वेडे आहात तुम्ही”

लग्नासाठी तिने एक पारंपरिक पंजाबी ज्वेलरी घातली होती. तसंच तापसीच्या आईच्या लग्नात अभिनेत्रीच्या आजीने दिलेला नेकलेस आणि कानातले तापसीने परिधान केले होते.

हेही वाचा… थरारक चित्रपट ‘शैतान’ आता येणार ओटीटीवर; वाचा कधी व कुठे पाहता येणार?

दरम्यान, तापसीच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, शाहरुख खानच्या ‘डंकी’ या सिनेमात तापसी पन्नू शेवटची झळकली होती. ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ या आगामी चित्रपटात तापसी झळकणार आहे. तापसीबरोबर या चित्रपटात सनी कौशल, विक्रांत मेस्सी, जिमी शेरगील हे कालाकारदेखील आहेत. जयप्रद देसाई दिग्दर्शित हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader