तापसी पन्नू बॉलीवूडमधील उत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारत तिने आपल्या अभिनयाचा ठसा हिंदी सिनेसृष्टीत उभारला आहे. ‘थप्पड’, ‘बदला’, ‘गेम ओव्हर’ अशा चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने तिने लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. अभिनयापलीकडे, तापसीने गेल्या वर्षी निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं.
सध्या तापसी तिचा बॉयफ्रेंड मॅथियास बोबरोबर लग्नबंधनात अडकल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान तापसीची जीवनशैली, प्रवास, मालमत्ता, संपत्ती याबद्दल जाणून घेऊयात.
आलिशान घर
तापसी पन्नू आणि तिची बहीण शगून यांचं ‘पन्नू पिंड’ नावाचं 3bhk मॉडर्न घर आहे. हे आलिशान घर अंधेरीत असून याचं डेकोर आधुनिक आणि विंटेज पद्धतीने केलं आहे. ट्रायबल प्रिन्ट्स, महाराजा स्टाईलचे पलंग आणि अनोखी सजावट असणारे हे घर तब्बल १० कोटींचं आहे.
कार कलेक्शन
तापसी पन्नूच्या गॅरेजमध्ये हाय-एंड गाड्या आहेत. मर्सिडीज GLE 250D, जीप कंपास, BMW 3-Series GT, BMW X1, आणि Audi A8L असं कार कलेक्शन तापसी पन्नूकडे आहे. या सगळ्याची एकत्रित किंमत लाखो रुपये आहे.
अभिनय आणि निर्मिती क्षेत्र
निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत तापसीने उद्योग क्षेत्रातील दिग्गज प्रांजल खंढडिया यांच्या सहकार्याने ‘आउटसाइडर्स फिल्म्स’ची स्थापना केली. ‘सुपर ३०’ आणि ‘पिकू’सारख्या चित्रपटांचा समावेश असलेल्या पोर्टफोलिओसह, हा उपक्रम तिच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा ठरला.
हेही वाचा… तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडकेच्या लग्नाला एक महिना पूर्ण; बहीण खुशबू फोटो शेअर करत म्हणाली…
अभिनय आणि निर्मितीव्यतिरिक्त तापसी पन्नू ब्रँड एंडोर्समेंटद्वारे ३५ ते ४० लाख फी आकारते. याव्यतिरिक्त, ‘लूप लपेटा’सारख्या थ्रिलर चित्रपटातील भूमिकांसाठी तिचं मानधन मोठ्या प्रमाणात होतं.
गुंतवणूक आणि क्रीडा आवड
मनोरंजन क्षेत्राच्या पलीकडे, प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये पुणे सेव्हन एसेस संघाची मालकी घेऊन तापसी पन्नूने तिची उद्योजकता दाखवली.
तापसीचं नेट वर्थ
चार कोटी रुपयांच्या अंदाजे वार्षिक उत्पन्नासह, तापसी पन्नूची जीवनशैली तिच्या अंदाजे $६ दशलक्ष (रु. ४६ कोटी) संपत्तीशी जुळते.