बॉलिवूडमधील करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. अनेकदा तैमूर पापीराझींसमोर फोटोसाठी पोझ देताना दिसून येतो. त्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आताही तैमूरच्या एअरपोर्टवरील एका व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सैफ अली खान आणि करीना कपूरला तैमूर आणि जेह यांच्यासह एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यातील सैफ अली खान आणि तैमुरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एअरपोर्टवर सैफ अली खान तैमूरचा हात पकडून चालत आहे. व्हिडीओमध्ये तैमुर सैफ अली खानची पॅण्ट खेचत असल्याचं दिसत आहे. यावर सैफ त्याला “माझी पॅण्ट खाली खेचणं बंद कर”, असं म्हणाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. सैफ अली खान आणि तैमूरचा हा व्हिडीओ ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा >> दिवाळीत होळी साजरी करतेय विराट कोहलीची लेक, वामिकाचा फोटो शेअर करत अनुष्का म्हणाली…

हेही वाचा >> “विमानात बसल्यानंतर भरत जाधवने…”, हास्यजत्रेच्या दिग्दर्शकाने सांगितला गौरव मोरेचा लंडनमधील इंग्रजी भाषेचा भन्नाट किस्सा

एका नेटकऱ्याने कमेंट करत “छोटा बच्चा समझके मुझको ना टकराना रे, असं तैमूर म्हणत असेल”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “वडील आणि मुलामधील नातं”, अशी कमेंट केली आहे. इतर नेटकऱ्यांनीही हसण्याचे इमोजी कमेंट केल्या आहेत.

हेही पाहा >> Photos : “बेरोजगारीमुळे मी केस वाढवले पण…”, गौरव मोरेने सांगितला गुगलची अ‍ॅड मिळाल्याचा ‘तो’ किस्सा

सैफ अली खान आणि करीना कपूर ही बॉलिवूडमधील जोडी कायमच चर्चेत असते. कुटुंबियांसह दिवाळी सेलिब्रेशनचे फोटोही करीनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले होते. यातील एका फोटोमध्ये जेह जमिनीवर लोळताना दिसत होता. खान फॅमिलीच्या या फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.