‘पाकीझा’ चित्रपटाचे दिग्दर्शक कमाल अमरोही यांचे सुपूत्र ताजदार अमरोही यांनी शर्मीन सेगलच्या एका विधानवर प्रतिक्रिया दिली आहे. शर्मीनने ‘हीरामंडी’मधील अभिनयासाठी मीना कुमारींच्या ‘पाकीझा’पासून प्रेरणा घेतली होती, असं म्हटलं होतं. त्यावर ‘हीरामंडी’ची ‘पाकीझा’शी तुलना होऊ शकत नाही, असं मत मीना कुमारींचे सावत्र पूत्र ताजदार यांनी मांडलं आहे.

‘हीरामंडी’मध्ये आलमजेबची भूमिका साकारण्यासाठी ‘पाकीझा’मधील मीना कुमारींच्या पात्रापासून प्रेरणा घेतली होती, असं शर्मीन म्हणाली होती. त्यावर ताजदार म्हणाले, “मी शर्मीनला ओळखत नाही. पण नाही, मी तिच्या शून्यतेबद्दलच्या विधानाशी सहमत नाही.” ‘पाकीझा’ हा लखनऊमधील एका ‘तवायफ’च्या जीवनावर आधारित सिनेमा होता. तर ‘हीरामंडी’ लाहोरमधील हीरामंडीच्या रेड-लाइट एरियामध्ये राहणाऱ्या महिलांवर आधारित आहे. त्यामुळेच बरेच जण याची तुलनाही करत आहेत. याबद्दल ताजदार म्हणाले, “हीरामंडी आणि पाकीझामध्ये खूप फरक आहे. दोन्हींची तुलना करू नका. ‘पाकीझा’ कोणीही पुन्हा तयार करू शकत नाही. मीना कुमारी किंवा कमाल अमरोही दोघेही पुन्हा जन्माला येऊ शकत नाही.”

सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “आजकालची मुलं आई-वडिलांची…”

‘हीरामंडी’ सीरिजमधील भूमिकेसाठी तिने कशी तयारी केली याबद्दल बोलताना शर्मीन सेगलने म्हटलं होतं की तिने नृत्य आणि संवादांचे उच्चार शिकण्यासाठी प्रशिक्षण घेतलं होतं. इतकंच नाही तर तिने मीना कुमारींचा ‘पाकीझा’ १५-१६ वेळा पाहण्याचा प्रयत्न केला होता. पण हा चित्रपट पाहण्यासाठी तिला थोडा वेळ लागला कारण तो तिने आधी पाहिलेल्या सगळ्या कलाकृतींपेक्षा वेगळा होता. “मीना कुमारी माझ्या प्रेरणास्थानांपैकी एक होत्या,” असं शर्मीन म्हणाली होती.

“स्तनांचा आकार वाढविण्यासाठी दबाव…”, बॉलीवूड अभिनेत्रीचा खुलासा; म्हणाली, “मी खऱ्या आयुष्यात…”

शर्मीनला या सीरिजमधील तिच्या अभिनयासाठी खूप ट्रोल करण्यात आलं. तिच्या अभिनयाबद्दल सोशल मीडियावर खूप मीम्स बनवण्यात आले, अनेक क्रिएटर्सनी व्हिडीओ बनवून तिला ट्रोल केलं होतं. या ट्रोलिंगबद्दल बोलताना शर्मीन म्हणाली, “पाकीझामधील मीना कुमारींची शून्यता मी हीरामंडीमधील माझ्या पात्रात आणण्याचा प्रयत्न केला”.

बॉयफ्रेंडपेक्षा वयाने मोठी आहे सोनाक्षी सिन्हा, अभिनेत्री ३७ वर्षांची तर झहीर इक्बालचं वय…

भन्साळी त्यांच्या वडिलांचा खूप आदर करतात, असं ताजदार यांनी ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ‘हीरामंडी’ आणि ‘पाकीझा’ या दोन्ही कलाकृतीत काही साम्य आहे का असं विचारलं असता ते म्हणाले, “मला याबद्दल बोलायचं नाही कारण भन्साळी माझे वडील कमाल अमरोही यांचे मोठे चाहते आहेत. भन्साळी त्यांच्या प्रत्येक चित्रपटात माझ्या वडिलांप्रमाणेच शॉट्स घेण्याचा प्रयत्न करतात.”