तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा हे बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेलं जोडपं आहे. काही दिवसांपूर्वी रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली देणारे तमन्ना व विजय यांची जोडी पहिल्यांदाच ऑनस्क्रीन पाहायला मिळाली आहे. दोघांनी पहिल्यांदाच ‘लस्ट स्टोरीज २’ मध्ये स्क्रीन शेअर केली आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित शॉर्ट फिल्ममध्ये या रिअल लाइफ जोडीची केमेस्ट्री पाहायला मिळाली.
कधी डेट वाईट ठरली आहे का? आणि कधी पहिल्याच डेटवर सेक्स केला आहे का? या प्रश्नांना उत्तरं देताना तमन्नानं न्यूज १८ ला सांगितलं की, डेट अनेकदा तिच्यासाठी वाईट ठरली आहे. पण, तिने कधीही पहिल्या डेटला सेक्स केलेला नाही. याच प्रश्नांची उत्तर देताना विजय म्हणाला की, “मी पहिल्याच डेटला सेक्स केला आहे”. तर, दिग्दर्शक सुजॉयने या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की, या बाबतीत तो फार लकी नाही.
दुसऱ्या डेटला सेक्स केला का आहे का? असं विजयने विचारलं असता सुजॉयने म्हणाला, “मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आहे, मला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. माझ्यासाठी काहीही सोपं नाही.” दरम्यान, टीमला ‘लस्ट स्टोरीज’मधील नीना गुप्ता यांचा ‘लग्नाआधी टेस्ट ड्राईव्ह करायला हवी,’ या डायलॉगशी सहमत आहात का, असं विचारण्यात आलं. त्यावर तमन्ना आणि विजय दोघांनीही होकार दिला.
‘लस्ट स्टोरीज २’ मध्ये नीना गुप्ता, तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा व्यतिरिक्त काजोल, मृणाल ठाकूर, अंगद बेदी, अमृता शुभाष, तिलोत्तमा शोम आणि कुमुद मिश्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत.