Tamannaah Bhatia And Vijay Varma Breakup : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तमन्ना भाटिया व अभिनेता विजय वर्मा यांच्या ब्रेकअपची चर्चा खूप रंगली आहे. अजूनपर्यंत दोघांनी अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही. याबाबत तमन्ना व विजयने मौन धारणं केलं आहे. पण, आता दोघांच्या ब्रेकअपमागच्या खऱ्या कारणाचा खुलासा झाला आहे. यासंदर्भातील पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. तमन्ना व विजयचं नातं का तुटलं? जाणून घ्या…

विकी लालवानीने इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या भल्यामोठ्या पोस्टमधून तमन्ना भाटिया व विजय वर्माच्या ब्रेकअपचं कारण समोर आलं आहे. या पोस्टनुसार, तमन्नाच्या वडिलांना विजय वर्माबरोबरचं नातं अजिबात पटलं नव्हतं. ते पूर्णपणे विरोध करत होते. पण जेव्हा तमन्ना व विजयने २०२४ किंवा २०२५मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अभिनेत्रीच्या वडिलांनी होकार दिला आणि लग्नाचा निर्णय स्वीकारला. पण नंतर तमन्नाने लग्नाचा विषय काढला नाही. त्यामुळे वडील हैराण झाले आणि त्यांनी तिला याबाबत विचारलं. तेव्हा तमन्नाने वडिलांना सांगितलं की, विजय लग्न करू इच्छित नाहीये. तसंच विजय आता कमिटेड राहिलं असं वाटतं नाही.

तमन्ना भाटिया पब्लिक अपीयरेंसमुळे निराश होती. विजयसाठी ती पब्लिक अपीयरेंस देत होती. हे ऐकून तमन्नाचे पालक म्हणाले की, आता याबद्दल आम्ही लोकांना कसं समजवू? तेव्हा अभिनेत्री म्हणाली होती, “याची गरज आहे का?” दरम्यान, तमन्ना व विजयच्या ब्रेकअप प्रकरणात आता दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी यांची एन्ट्री झाली आहे. ब्रेकअपनंतर चिरंजीवी यांनी तमन्नाला सल्ला दिला की, तू स्वतः जाऊन ब्रेकअपची बातमी माध्यमांना सांग. कारण हे तुझ्यासाठी चांगलं असेल. पण, अजूनही तमन्नाचं याबाबत कोणतंही विधान आलेलं नाही.

तमन्ना व विजयची पहिली भेट

Tamannaah Bhatia And Vijay Varma

नेटफ्लिक्सवरील ‘लस्ट स्टोरीज २’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विजय वर्मा आणि तमन्ना भाटियाची पहिली भेट झाली होती. त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली. दोन वर्षांपूर्वी जेव्हा न्यू इअरच्या गोव्यातील पार्टीमध्ये विजय आणि तमन्ना एकत्र दिसले, तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. त्यानंतर दोघं मुंबई विमानतळावरही एकत्र पाहायला मिळाले. ‘लस्ट स्टोरीज २’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी विजय व तमन्नाने प्रेमाची कबुली दिली. पण, मार्च महिन्याच्या सुरुवातीला दोघांचा ब्रेकअप झाल्याचं समोर आलं. ‘पिंकविला’च्या वृत्तानुसार, विजय व तमन्नाने ब्रेकअपनंतर दोघांमध्ये चांगली मैत्री ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दोघं अजूनही इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करत आहेत.