मनोरंजन विश्वातील अनेक जोडपे काहीना काही कारणांनी सतत चर्चेत राहत असतात. असेच एक लोकप्रिय जोडपे म्हणजे अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) व अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma). दोघे सोशल मीडियावर कायम चर्चेत राहत असून दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. दोघांनी आपल्या नात्याविषयी जाहीर कबुली दिल्यापासून अनेक चाहते ही जोडी लग्न कधी करणार याची वाट पाहत होते. अशातच गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होत आहेत. दोघंही एकमेकांना दोन वर्षांपासून डेट करत होते. मात्र आता या दोघांमधलं नातं संपुष्टात आलं असून त्यांनी फक्त चांगले मित्र म्हणून राहण्याचा निर्णय घेतला आहे असल्याचे अनेक वृत्तं समोर येत आहेत.

‘लस्ट स्टोरीज २’ या वेब सीरिजनंतर विजय (Vijay Varma) आणि तमन्नाने (Tamannaah Bhatia) एकमेकांना डेट करत असल्याचं मान्य केलं होतं. रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर हे दोघेही अनेक ठिकाणी एकत्र दिसलेले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आपलं नातं फार काळ लपवून ठेवलं नव्हतं. दोघे लवकरच लग्नही करणार होते. मात्र आता दोन वर्षांनी या दोघांचं नातं संपुष्टात आल्याची चर्चा रंगली आहे. अर्थात याबाबत तमन्ना किंवा विजय यापैकी कुणीही भाष्य केलेलं नाही. अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही आठवड्यांपूर्वीच हे जोडपे वेगळे झाले आहेत आणि दोघे वेगळे होण्याचे नेमके कारण समोर आलं आहे.

‘हे’ आहे तमन्ना भाटिया आणि विजय वर्माच्या ब्रेकअपचे कारण

सियासत डेलीच्या वृत्तानुसार, दोघे त्यांच्या भविष्याबद्दल वेगवेगळे विचार असल्यामुळे त्यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, तमन्ना (Tamannaah Bhatia) लग्न करून स्थायिक होण्यास उत्सुक होती; पण विजय यासाठी तयार नव्हता. लग्नाच्या विषयावरून दोघांमध्ये वारंवार मतभेद होत होते, ज्यामुळे अखेर त्यांचे ब्रेकअप झाले असं म्हटलं जात आहे. याबद्दल अद्याप दोघांपैकी कुणीही अधिकृत भाष्य केलं नाही. त्यामुळे अनेक जण त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहेत.

यामुळे रंगल्या ब्रेकअपच्या चर्चा

दरम्यान, तमन्ना (Tamannaah Bhatia) व विजय या(Vijay Varma) दोघांनीही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एकममेकांबरोबरचे फोटो डिलीट केले आहेत. त्यामुळे या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अर्थात याबाबत तमन्ना किंवा विजयने भाष्य केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा खऱ्या आहेत का? दोघांनी खरंच सहमतीने वेगळे होण्याचा घेतला आहे का? याबद्दल दोघे काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader