दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. काही दिवासांपूर्वीच तमन्नाने प्रेमाची कबुली दिली आहे. तमन्ना बॉलिवूड अभिनेता विजय वर्माला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. अखेर तमन्नाने विजय वर्माबरोबरच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केलं.
विजय वर्माच्या आधी तमन्नाचं नाव भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीबरोबर जोडलं गेलं होतं. विराट व तमन्नाने एका जाहिरातीत एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर तमन्नाने एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं होतं. “लोकांना खरं काय माहीत असावं, अशी माझी इच्छा आहे. मी आणि विराट जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान फक्त चार शब्द बोललो. त्यानंतर मी विराटला कधीही भेटले नाही. पण माझ्याबरोबर काम करणाऱ्या अनेक अभिनेत्यांपेक्षा तो उत्तम अभिनय करतो,” असं ती म्हणाली होती.
विराटने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्नगाठ बांधली. विराटच्या लग्नाबाबत माहीत होतं का? असा प्रश्नही तमन्नाला विचारण्यात आला होता. यावर उत्तर देत ती म्हणाली, “त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ते दोघेही खूप छान दिसत होते. त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी मी प्रार्थना करते.” तमन्ना ‘लस्ट स्टोरीज २’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये सध्या ती व्यग्र आहे.