दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया लवकरच ‘जेलर’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जेलर’मध्ये तमन्ना सुपरस्टार रजनीकांत यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. ३३ वर्षीय तमन्ना आणि ७२ वर्षीय रजनीकांत यांची जोडी जेलरमध्ये एकत्र दिसणार असल्याने नवा वाद सुरु झाला असून अनेकांनी वयामुळे या दोघांना ट्रोल केले आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात तमन्नाने या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.
हेही वाचा : “रणवीरने पहिल्याच दिवशी चुकीचा सीन…”, करण जोहरने सांगितला सेटवरचा किस्सा; म्हणाला, “त्याला ४ तास…”
‘जेलर’ चित्रपटातील तमन्ना भाटिया आणि सुपरस्टार रजनीकांत यांची जोडी अनेकांना आवडलेली नाही. दोघांच्या वयामध्ये असलेले ३९ वर्षांचे अंतर हे यामागचे प्रमुख कारण आहे. अलीकडेच अभिनेत्रीला “७२ वर्षांचा हिरो अन् ३३ वर्षांची हिरोईन”, “दोघांमध्ये ३९ वर्षांचा फरक आहे” अशा बऱ्याच कमेंट करून ट्रोल करण्यात येत होते. “तू आ दिलबरा” या गाण्याच्या लॉन्चवेळी तमन्नाला वयातील अंतर आणि ट्रोलर्सबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तमन्नाने सर्वप्रथम रजनीकांत यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यानंतर अभिनेत्री म्हणाली, “तुम्ही वयाचा फरक का पाहताय? कलाकार पडद्यावर साकारत असलेली व्यक्तिरेखा पाहणे जास्त महत्त्वाचे असते.”
हेही वाचा : Video : “भयानक चालतेय…”, सारा अली खानचा रॅम्प वॉक पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल, म्हणाले…
तमन्ना पुढे म्हणाली, “वयाबद्दलच बोलायचे झाले तर, हॉलीवूड अभिनेता टॉम क्रूझ आज वयाच्या ६० व्या वर्षीही जबरदस्त अॅक्शन करताना दिसतो. आता माझ्या वयाबद्दल बोलायचे झाले तर मलाही म्हातारी झाल्यावर डान्स करायला आवडेल. वयाने काय फरक पडतो? एक कलाकार म्हणून तुम्ही आमच्याकडे पाहा.”
हेही वाचा : “लोक काय म्हणतील याची पर्वा…”, ईशा केसकरने लिव्ह इन रिलेशनशिपबाबत मांडले स्पष्ट मत; म्हणाली, “लग्न केले तर…”
दरम्यान, तमन्ना भाटिया आणि रजनीकांत मुख्य भूमिका साकारत असलेला जेलर चित्रपट १० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. जेलर’ हा एक तमिळ चित्रपट आहे जो हिंदी, मल्याळम, कन्नड, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये डब केला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नेल्सन दिलीप कुमार यांनी केले आहे. ‘जेलर’नंतर तमन्ना लवकरच ‘भोला शंकर’ या चित्रपटात ६७ वर्षीय अभिनेते चिरंजीवी यांच्यासह मुख्य भूमिकेत दिसेल.