दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. ‘बाहुबली’ आणि ‘लस्ट स्टोरीज २’ या चित्रपटांमुळे तमन्ना साऊथसह बॉलीवूडमध्येही चर्चेत आली. आता तमन्ना भाटियाचा ‘जेलर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेत्री सुपरस्टार रजनीकांत यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. अभिनेत्रीने चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त नुकत्याच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तमन्नाला पाहून तिच्या एका चाहत्याने असे काही केले की, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “आज बिल्डिंगमध्ये फरसाण वाटते…”, सई ताम्हणकरने वाढदिवसानिमित्त प्राजक्ता माळीला दिल्या हटके शुभेच्छा

सोशल मीडियावर तमन्ना भाटियाचा हा व्हायरल व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. केरळमधील कार्यक्रमास्थळावरून निघाल्यावर तमन्ना सर्व चाहत्यांना हात दाखवत जात होती. इतक्यात तिच्या एका चाहत्याने सुरक्षा रक्षकांच्या गर्दीतून वाट काढत, अंगरक्षकांना धक्का देत तमन्नाचा हात धरला. हा संपूर्ण प्रकार पाहून तमन्ना काहीशी गोंधळली.

हेही वाचा : “शिल्पाला चुकूनही लेखिका म्हणणार नाही”, सुकन्या मोनेंनी केला लाडक्या मैत्रिणीविषयी खुलासा; म्हणाल्या, “तिचा उल्लेख…”

चाहत्याने असा प्रकार केल्यानंतर तमन्नाच्या अंगरक्षकांनी त्याला लगेच मागे खेचले आणि पुढे न येण्याचा इशारा दिला. त्यानंतरही चाहत्याचा तमन्नाला भेटण्यासाठी गोंधळ सुरु होता. हा प्रकार पाहिल्यानंतर तमन्नाने त्या चाहत्याला पुढे बोलावले आणि त्याला शांत राहण्यास सांगितले. तिने अगदी नम्रपणे त्याच्याशी हात मिळवला आणि फोटो काढला.

हेही वाचा : Video “मला राहुल गांधींबरोबर लग्न करायचं आहे पण…”; अभिनेत्रीने ठेवली ‘ही’ अट

अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नेटकरी तमन्नाचे भरभरून कौतुक करत आहेत. दरम्यान, तमन्ना भाटिया आणि रजनीकांत यांचा ‘जेलर’ चित्रपट येत्या १० ऑगस्टला रिलीज होणार आहे. या चित्रपटातील कावाला हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamannaah bhatia keeps her cool as fans breaches security hold her hand watch viral video sva 00