Tamannaah Bhatia : बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. स्त्री २ या चित्रपटातल्या तिच्या गाण्यानेही लक्ष वेधलं होतं. तसंच बाहुबली सिनेमातील तिची भूमिकाही अनेकांच्या स्मरणात आहे. याच तमन्ना भाटियाच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे. कारण ईडीकडून तमन्नाची ( Tamannaah Bhatia ) कसून चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी तमन्नाला ईडीने समन्स धाडलं होतं. त्यानंतर तमन्नाची गुवाहाटी येथील ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. अभिनेत्री तमन्ना ( Tamannaah Bhatia ) तिच्या आईसह ईडी कार्यालयात पोहचली होती. गुरुवारी दुपारी तिला चौकशीसाठी बोलवण्यात आलं. ज्यानंतर काही तास तिची चौकशी सुरु होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तमन्ना भाटियावर काय आरोप?

FairPlay नावाचं अॅप आहे याचं प्रमोशन केल्याचा आरोप तमन्नावर ( Tamannaah Bhatia ) आहे. हे अॅप महादेव बेटिंग अॅपशी संबंधित आहे. या अॅपवर मनोरंजन क्षेत्र, क्रिकेट, पोकर, बॅडमिंटन, कार्ड गेम्स, फुटबॉल या सगळ्यासाठी बेटिंग करता येतं. या अॅपचं प्रमोशन केल्यानं तमन्ना चर्चेत आली. त्यामुळे तिच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. ती आता थेट ईडीच्या रडारवर आहे त्यामुळेच तिची गुवाहाटी येथील ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली.

मागील वर्षी रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांनाही समन्स

महादेव बेटिंग अॅप प्रकरणात आत्तापर्यंत रणबीर कपूर, श्रद्धा कपूर यांनाही समन्स पाठवलं गेलं होतं. तसंच या प्रकरणात गेल्या वर्षी कपिल शर्माचीही चौकशी झाली होती. या सगळ्यानंतर आता तमन्ना भाटियाच्या अडचणी वाढल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत ईडीने एकूण ४९० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त केल्याचीही माहिती आहे. FairPlay हे एक बेटिंग अॅप आहे. त्यात अनेक प्रकारचे गेम्स आहेत ज्यावर सट्टा लावता येतो.

महादेव बेटिंग अॅप कडून लोकांना आमीष

समोर आलेल्या माहितीनुसार या महादेव बेटिंग अॅपच्या माध्यमातून ५७ हजार रुपये गुंतवल्यास रोज ४ हजार रुपये मिळतील असं आमीष लोकांना दाखवण्यात आलं आहे. घोटाळा करण्यासाठी शेल कंपन्यांच्या नावे बनावट अकाऊंट तयार करण्यात आली आहे. लोकांनी गुंतवलेले पैसे क्रिप्टो करन्सी आणि बिटकॉईन्समध्ये गुंतवण्यात आले आहेत अशीही माहिती समोर आली आहे.

तमन्नाचे चाहते चिंतेत

तमन्नाने ( Tamannaah Bhatia ) आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तिच्या भूमिका जास्त आहेत. बाहुबली या सिनेमानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काही वेबसीरिजमध्येही काम केलं आहे. तिचा असा एक खास चाहता वर्ग आहे. एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर तमन्नाची ईडी चौकशी झाल्याची बातमी पोस्ट करण्यात आली आहे. त्यानंतर तिचे चाहतेही चिंतेत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamannaah bhatia questioned by ed in mahadev betting app case scj