अभिनेत्री तमन्ना भाटिया व अभिनेता विजय वर्मा यांचं नातं सध्या बॉलिवूडमधील सर्वात चर्चेचा विषय आहे. तमन्नाने प्रेमाची कबुली दिल्यानंतर ते बी-टाउनमधील हॉट टॉपिक बनले आहेत. अशातच तमन्ना ‘जी करदा’ आणि ‘लस्ट स्टोरी २’ मध्येही झळकणार आहे. चित्रपटांपेक्षा तमन्ना सध्या विजयबरोबरच्या नात्यामुळे जास्त चर्चेत आहे. ‘लस्ट स्टोरी २’ मध्ये तमन्ना व विजय एकत्र दिसणार आहेत.
हेही वाचा – तमन्ना भाटियाने प्रेमाची कबुली दिल्यानंतर विजय वर्मा म्हणाला, “माझ्या आयुष्यात…”
‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना तमन्नाने कलाकारांच्या नात्याबद्दल सतत बोललं जातं, त्यांच्या नात्यांची कशी चौकशी केली जाते याबद्दल चर्चा केली. खरं तर या टप्प्यात जोडपे एकमेकांना समजून घेण्यासाठी, बाँडिंग घट्ट करण्यासाठी वेळ घेत असतात. पण, त्याचा विचार न करता माध्यमं सारखे त्यांच्या नात्याबद्दल चर्चा करत असतात. पण, आपल्याला आता या गोष्टींचा फरक पडत नसल्याचं तमन्नाने सांगितलं.
हेही वाचा – विजय वर्माशी अफेयरच्या चर्चांवर तमन्ना भाटियाने मौन सोडलं; म्हणाली, “मला मनापासून…”
“माझ्याकडे काय होतं किंवा आता काय आहे हा एक खूप चांगला अनुभव होता. मी स्वतःला आरशात बघताना आनंदी असायला हवं. त्यामुळे काही गोष्टींचा मला फरक पडत नाही. सुरुवातीला माझे पालक काय विचार करतील, याची मला काळजी वाटायची. पण हळुहळू मी या सगळ्या गोष्टी मागे सोडून पुढे जायला शिकले. मी त्याला यश मानते. आज माझ्या जवळच्या लोकांच्या आजारपणाशिवाय माझ्या आनंदी नसण्याला दुसरं कोणतंही कारण नाही,” असं तमन्ना हसत म्हणाली.
दरम्यान, तिच्या आणि विजयच्या नात्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांबद्दल विचारल्यावर तमन्ना म्हणाली, “मला सांगायला काही असेल तेव्हा मी याबद्दल बोलेन. मला माहीत आहे की ते मनोरंजक आहे आणि लोकांना त्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे. हा जेवणाच्या टेबलावर चर्चा करण्यासाठी चांगला विषय आहे.”
तमन्नाचा ‘जी करदा’ चित्रपट आज १५ जूनपासून अॅमेझॉन प्राइम व्हिडीओर पाहता येणार आहे. अनुरिमा शर्मा दिग्दर्शित, या शोमध्ये सुहेल नय्यर, सायन बॅनर्जी, आशिम गुलाटी, हुसैन दलाल आणि अन्या सिंग यांच्याही भूमिका आहेत.