तमन्ना भाटिया ही दक्षिण आणि बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकताच तिचा ‘लस्ट स्टोरीज २’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये ती पहिल्यांदा बॉयफ्रेंड विजय वर्मासोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे. नुकतचं तमन्नाने स्वत:बाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.

हेही वाचा- ‘किसी का भाई किसी की जान’च्या अपयशानंतर सलमान खाननं घेतला मोठा निर्णय, संजय लीला भन्साळींना फोन करत म्हणाला…

एका मुलाखतीत बोलताना तमन्ना म्हणाली “जेव्हा मी पहिल्यांदा इंडस्ट्रीत आले तेव्हा मला एका निर्मात्यांनी सल्ला दिला होता. ते म्हणालेले चालताना, बोलताना, नाचताना तुला नेहमी मुलीसारखं वागावं लागेल. मी चित्रपटात काम करत असताना मला हे समजावून सांगण्यात आले. गंमत म्हणजे या चित्रपटात मला जी भूमिका करायची होती त्यासाठी मला मुलीसारखे दिसायचे होते. तसे चालायला शिकावे लागले.”

हेही वाचा- अदिती राव हैदरीने सिद्धार्थबरोबरच्या अफेअरबाबत सोडलं मौन; म्हणाली, “मला वाटतं की प्रत्येक…”

तमन्ना पुढे म्हणाली. लोक माझ्या चालण्याची चेष्टा करत होते. मी पुरुषांसारखे चालते असं त्यांच म्हणण होतं. मला मुलींसारखं चालण्याचा सल्ला अनेकदा दिला गेला. कारण मी शाळेत दादा होते. एका समोस्यासाठी मी मुलांबरोबर भांडत होते. मी गुंडी होते. पण अभिनेत्री बनायचे माझे स्वप्न होते आणि शिफॉन साडी घालून मला डान्स करण्याचे माझे ध्येय होते.”

हेही वाचा- अजय देवगणने मुंबईत खरेदी केली नवी मालमत्ता; किंमत वाचून बसेल धक्का

तमन्नाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झाल तर तिचा ‘लस्ट स्टोरीज २’ चित्रपट १९ जूनला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तमन्ना आणि विजय काजोल, नीना गुप्ता, तिलोत्तमा शोम, मृणाल ठाकूर, तमन्ना भाटिया, अमृता सुभाष, विजय वर्मा, कुमुद मिश्रा, अंगद बेदी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Story img Loader